spot_img
ब्रेकिंगBreaking : बेडेकर लोणची-मसाले फेम अतुल बेडेकर यांचं निधन

Breaking : बेडेकर लोणची-मसाले फेम अतुल बेडेकर यांचं निधन

spot_img

नगरसह्याद्री टीम : जनमानसात मराठमोळे पदार्थ प्रसिद्ध करणाऱ्या मराठी उद्योग समुह व्ही पी बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या कंपनीने लोणची, मसाले, चटणी या पारंपरिक मराठमोळ्या खाद्यपदार्थांना जगभरात प्रतिष्ठा मिळवून दिली.

विश्वनाथ परशुराम बेडेकर यांनी १९१० मध्ये हे रोपटं लावलं. गिरगावात लोणची-मसाल्यांचं दुकान सुरु केलं. पुढे जसजसा खप वाढला तसतसा दुकानाच्या शाखांचा विस्तार झाला. दादर, फोर्टमध्ये माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांची अल्पावधीतच पाच दुकानं झाली. १९४३ मध्ये ‘व्ही. पी. बेडेकर अँड सन्स लिमिटेड’ असं कंपनीचं नामकरण करण्यात आलं. बेडेकर परिवार उद्योग समूहाने शतकभराच्या प्रवासाचा आदर्श घालून दिला आहे.

मसाले, लोणचे, पापड यांच्या माध्यमातून त्यांनी देश-विदेशातील घरात स्थान निर्माण केले आहे. अतुल बेडेकर यांनी या उद्योग समूहाच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व केले. आपल्या धडाडीने त्यांनी या उद्योग समुहात काळानुरुप बदल घडवून घोडदौड चालू ठेवली होती. कर्जतच्या फॅक्टरीत जवळपास 600 टन लोणचं सीझनला बनतं.

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये विक्री होते. त्याचबरोबर सातासमुद्रापलीकडे बेडेकर नाव पोहचले आहे. अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि पूर्वेकडील देशांमध्ये देखील निर्यात होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर...

राणीताई लंके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; महायुतीत एकमत होईना

तिरंगी-चौरंगी लढतीची शक्यता गणेश जगदाळे | नगर सह्याद्री विधानसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहे. पारनेर...

पवारांच्या नातवाकडून कर्जत-जामखेडकरांचा भ्रमनिरास; रोहित पवारांविरोधात तरुणाई देखील एकवटली

साधा माणूस म्हणून राम शिंदेंचा मार्ग झाला अधिक सुकर कर्जत | नगर सह्याद्री पवारांचा नातू म्हणून...

जागावाटपाआधीच आघाडीत बिघाडी; काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीचा अर्ज…

मुंबई / नगर सह्याद्री - महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप जाहीर झालेले नाही. कोणती...