spot_img
अहमदनगरगुढीपाडवाच्या मुहूर्तावर 'रचना' कन्स्ट्रशनची सवलतीची गुढी! बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना...

गुढीपाडवाच्या मुहूर्तावर ‘रचना’ कन्स्ट्रशनची सवलतीची गुढी! बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना…

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
मराठी नववर्षाच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नगर जिल्ह्या तील सर्वसामान्य माणसाचे घराचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार बांधकाम क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या रचना कंट्रशनने घेतला आहे. त्यामुळे या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ९ एप्रिल ते ११ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये वन बी एचके व टु बीएचके घर खरेदीवर ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणावर घसघशीत सूट दिली जाणार असल्याची माहिती रचना कंट्रशनचे संचालक राजू जाधव व जनरल मॅनेजर रणधीर कांबळे यांनी दिली आहे. त्यामुळे या तीन दिवसात जर फ्लॅट खरेदी किंवा बुकिंग करणारा ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर व घसघशीत सवलत मिळणार असल्याचेही संचालक राजू जाधव यांनी सांगितले.

बांधकाम क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेल्या व नावाजलेल्या रचना कन्स्ट्रशनच्या वतीने येथील नगर- कल्याण महामार्गावरील श्री स्वामी समर्थ ओल्डेज होम केअर सेंटरसमोर अल्फा-१ या १० मजली एक व दोन बीएचके लझरिअस फ्लॅट व दुकानांच्या बांधकाम प्रकल्पाचा प्रारंभ झाला असून गुढीपाडव्या निमित्त बुकिंग अथवा खरेदी केली असता मोठा लाभ मिळणार आहे.बांधकामाचा उच्च दर्जा, व्यवहारातील पारदर्शकता व गुणवत्ता या बळावर रचना कन्स्ट्रशन कंपनीने लोकप्रियता मिळवली आहे.तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरातील नावाजलेल्या या बांधकाम कंपनीस २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. देशभरात शंभरपेक्षा अधिक प्रकल्प त्यांनी सरकारी संस्था, बांधकाम कंपन्या, प्रतिष्ठित विकासक यांच्यासाठी यशस्वी- रीत्या पूर्णत्वास नेले आहेत.

नगरमध्ये कंपनीच्या वतीने प्रथमच भव्य अशा बांधकाम प्रकल्पाची उभारणी करण्यात येत असून, प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंपनी – नगरमध्ये अल्फा-१ हा अद्ययावत व सुविधांनी परिपूर्ण बांधकाम प्रकल्प काम गुढीपाडव्यानिमित्त सुरू करीत आहे. प्रशस्त लॉबी, हॉल, किचन, बेडरूम्व भरपूर पाणी याबरोबरच मास्टर बेडरूममध्ये वूडन फ्लोअरिंग, सर्टिफाईड फ्लोअरिंग, ब्रँडेड सॅनिटरी वेअर, ग्रॅनाइट किचन ओटा, मुख्य व आतील लाकडी फ्लश दरवाजा, ३ ट्रॅक अ‍ॅल्युमिनिअम स्लायडिंग खिडया मॉस्किटो मॅटसह, अशी अनेक वैशिष्ट्ये या प्रकल्पात पाहायला मिळतील. नगरकरांनी अधिक माहितीसाठी या ठिकाणी भेट द्यावी, असे आवाहन रचना कन्स्ट्रशनचे संचालक राजू जाधव व जनरल मॅनेजर रणधीर कांबळे यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...