spot_img
ब्रेकिंगएकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा? प्रवेशाच्या चर्चावर 'गिरीश महाजन' यांचा टोला

एकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा? प्रवेशाच्या चर्चावर ‘गिरीश महाजन’ यांचा टोला

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-

राज्याच्या राजकारणात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांची भाजपात घरवापसी होणार आहे. एकनाथ खडसे यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. “मी भाजपात प्रवेश करणार आहे”, असं खडसे म्हणाले आहेत

एकनाथ खडसे यांनी साडेतीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. या दरम्यान त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली. ते सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत. असं असताना त्यांनी आता परत भाजपात घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे.एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपात एकच खळबळ उडाली आहे.

खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. आता खडसे पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चवर मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन ?

एकनाथ खडसे एका विझलेल्या दिव्यासारखे आहेत. त्यांची पत्नी व मुलीचाही निवडणुकीत पराभव झाला आहे. सध्या एकही ग्रामपंचायत त्यांच्या हातात नाही. ते एका बँकेला नियंत्रित करत होते. पण आता संचालक मंडळ बदलले असून, नव्या बोर्डाचे सदस्य त्यांचे काहीएक ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...