Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यावर महायुती सरकार महिलांना दर महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे महिलांना लवकरच २१०० रुपये देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. राज्यातील कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आता महिलांना डिसेंबर महिन्यापासून पैसे देण्यास पुन्हा सुरुवात केली जाणार आहे.
महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची ग्वाही दिली आहे. याची अंबलबजावणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर होणार आहे. म्हणजेच महिलांना २१ एप्रिलपासून २१०० रुपये मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात सरकारने १ जुलैपासून दर महिन्याला लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले आहे. त्यानंतर सरकार पुन्हा आल्यावर महिलांना २१०० रुपये देणार असल्याचे वचन दिले होते. त्यामुळे आता बहिणींना २१०० रुपये देणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना पुढच्या महिन्यापासून मिळू शकतो. आचारसंहिता संपल्यावर महिलांना पैसे मिळणार आहे. परंतु सध्या महिलांना १५०० रुपये मिळणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहे.