spot_img
तंत्रज्ञानयुतीला मिळालेले यश हीच वाढदिवसाची भेट: डाॅ. सुजय विखे पाटील

युतीला मिळालेले यश हीच वाढदिवसाची भेट: डाॅ. सुजय विखे पाटील

spot_img

लोणी । नगर सहयाद्री:
महायुतीवर विश्‍वास दाखवून जिल्‍ह्यातील मतदारांनी दहा विधानसभा मतदार संघामध्‍ये मिळालेल्‍या यशाची भेटच माझ्या वाढदिवसासाठी खुप मोठी आहे. आता निवडणूका संपल्‍या असल्‍याने जिल्‍ह्याच्‍या विकास प्रक्रीयेला गती देणार असल्‍याचे प्रतिपादन डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.

डॉ.सुजय विखे पाटील यांना वाढदिवसाच्‍या निमित्‍ताने संपूर्ण जिल्‍ह्यातून महायुतीतील पक्ष संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने जनेसवा कार्यालयात उपस्थित होते. कुठल्‍याही अभिष्‍टचिंतन सोहळ्याचे आयोजन न करता डॉ.विखे पाटील यांनी शुभेच्‍छांचा स्विकार केला. विविध संस्‍थाचे आधिकारी यांचीही या निमित्‍ताने उपस्थिती होती.

माध्‍यमांशी संवाद साधताना डॉ.विखे पाटील म्‍हणाले की, या शुभेच्‍छारुपी प्रेमाच्‍या पाठबळावरच आजपर्यंतची वाटचाल आपण केली. सर्वसामान्‍य जनतेशी राहीलेला संवाद यामुळे नुकत्‍याच संपन्‍न झालेल्‍या विधानसभा निवडणूकीत मोठे यश हे महायुतीला मिळाले. जिल्‍ह्यातील जनतेने महायुतीच्‍या कामावर तसेच योजनांच्‍या झालेल्‍या अंमलबजावणीवर विश्‍वास व्‍यक्‍त केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीतील फरक जनतेच्‍या लक्षात आला त्‍यामुळेच महायुतीला पुन्‍हा राज्‍यात संधी देण्‍याचा निर्धार जिल्‍ह्यातील जनतेने केला होता. दहा विधानसभा मतदार संघामध्‍ये महायुतीचे आमदार आज विजयी झाले याचा सर्वाधिक आनंद आहे.

प्रचाराच्‍या निमित्‍ताने शिर्डी मतदार संघातील अनेकजन येवून आमच्‍या विरोधात वक्‍तव्‍य करीत होती. पण जनताही विकासाच्‍या मागे ठामपणे उभी राहते. ज्‍यांनी खोटे आरोप केले, त्‍यांना जिल्‍ह्यातील जनतेने मतदानाच्‍या माध्‍यमातून धडा शिकविला असल्‍याचे सांगतानाच आता निवडणूक प्रक्रीया संपली आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्याच्‍या विकासासाठी जे जे शब्‍द आम्‍ही दिले आहेत ते पुर्ण करण्‍याची कटिबध्‍दता आम्‍ही ठेवणार असल्‍याचे डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपात्र; कारण आलं समोर..

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडकी...

स्व. वसंतराव झावरे यांची स्वप्ने पूर्ण करणार; कोण काय म्हणाले पहा…

आ. काशीनाथ दाते | वासुंदे येथे स्व. आ. वसंतराव झावरे पाटील यांच्या पुण्यस्मरणनिमित्त कार्यक्रम पारनेर...

‘त्यांना’ दिल्लीच्या जनतेने जागा दाखविली; मंत्री विखे पाटील

लोणी | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभेत मिळविलेला एैतिहासिक विजय विचारांचा आणि विकासाचा...

…म्हणुन दोन गटांत राडा; ‘असा’ घडला नको तोच प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शेतजमिनीच्या वादातून दोन गटांत मारहाण झाल्याची घटना शिंगवे नाईक शिवारात बुधवारी...