spot_img
अहमदनगरनीलेश लंके खासदार झाल्यास नगरचा बिहार? विषाची परीक्षा न पाहण्याचे 'यांनी' केले...

नीलेश लंके खासदार झाल्यास नगरचा बिहार? विषाची परीक्षा न पाहण्याचे ‘यांनी’ केले आवाहन

spot_img

हा तर वेडा बनुन पेढा खाणारा | ‘त्याच्या’ गुंडांना गावकरी पिटाळताहेत | ‘तो’ हुल्लडबाजांच्या टोळीचा म्होरक्या!अहमदनगर | नगर सह्याद्री
नगरमध्ये प्रस्थापित, श्रीमंतीच्या विरोधात उभा असल्याच नाटक नीलेश लंके करत आहे. खरंतर तोच सुपा एमआयडीसीत मोठा प्रस्थापित आहे. त्याला आता त्याची बायको आमदार करायची आहे. पोलिसांना, तुझा बाप येतोय असं म्हणणारा आणि कलेक्टर सारख्या अधिकार्‍यांना ऐ कलेक्टर असं संबोधणार्‍या लंके व त्याच्या टोळीपासून जिल्ह्याला मोठा धोका आहे. नगरकरांनी विषाची परीक्षा पाहू नये! पारनेरकरांची ही हौस अवघ्या चार वर्षात झालीय! आता ती चूक नगरकरांनी करू नये.

पारनेरकर त्याच्या विरोधात मोठे मताधिक्य सुजय विखे यांना देऊन चार- साडेचार वर्षापूर्वीची चूक दुरूस्त करण्यास सज्ज झाले आहेत. कायम गुंडांच्या कोंडाळ्यात राहणारा नीलेश लंके हा निवडून द्यायच्या लायकीचाच नसल्याचा घणाघाती आरोप करतानाच हुल्लडबाजांच्या टोळीच्या या म्होरक्याचा बंदोबस्त करण्याची वेळ आली असून त्याच्या टोळीसह त्याच्यापासून नगरला मोठा धोका असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे राज्य प्रवक्ते इंजि. संजीव भोर पाटील यांनी ‘नगर सह्याद्री’शी बोलताना केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर मतदारसंघात शिवसेनेची भूमिका मांडताना संजीव भोर पाटील यांनी नीलेश लंके यांच्यावर थेट हल्लाबोल केला.नीलेश लंके सामान्यातून जात असल्याने त्याच्या पाठीशी आम्ही साडेचार वर्षापूर्वी होतो. सामान्यातला एखादा लोकप्रतिनिधी म्हणून जात असेल तर समाजकारणातून आलेल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनाही वाटायचे की आपण अशा माणसाला सपोर्ट केला पाहिजे मदत केली पाहिजे.

मात्र त्यानंतर एकंदरीत या तालुयातलं या विधानसभा मतदारसंघातलं जर वर्तन आपण बघितले असेल तर त्यावेळेस निलेश लंकेच्या निवडणुकीत त्यांच्याबरोबर जे प्रमुख चेहरे जे विचारे होते आज एकही दिसायला तयार नाही. सामान्य घटकाला न्याय मिळेल असा आमचा भ्रम होता. मात्र, आमचा भ्रमनिरास झाला असल्याचेही भोर यांनी स्पष्ट केले.

दारात आलेल्या भिकार्‍याला दान देताना त्याची जाहिरात करण्याची या माणसाची प्रवृत्ती आहे आणि पारनेरच्या जनतेला हे समजले आहे. पारनेरमधील लोकांना त्यांचा चेहरा कळलेला आहे. मात्र शेवगाव पाथर्डी कर्जत जामखेड श्रीगोंदा राहुरी नगर शहरातील जनतेने हे समजून घेण्याची गरज आहे. हा माणूस वेडा बनून पेढा खातो हे या मतदारसंघातल्या जनतेने ओळखलं पाहिजे असे आवाहनही भोर यांनी केेले.

सुप्यातील त्या धंद्यामध्ये अडकलाय अन् म्हणे मी गरीब!
निवडणुकीत श्रीमंत गरीब हा विषय खरतर आणण्याचे काही कारण नाही. निलेश लंकेना गरीब म्हणणं म्हणजे फार मोठा विनोद आहे. सुपा एमआयडीसीतला मुरूम डबर तिथल्या कामगारांना कर्मचार्‍यांना वाहतूक करणार्‍या कंपन्यांच्या बसेस, तिथले प्लॉट, कशात निलेश लंकेने आपला वाटा टाकला नसेल असं जबाबदारीने एक तरी माणूस सांगू शकेल का? गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या माणसाबरोबर सातत्याने राहतात. सामान्य माणूस, सामान्य उमेदवाराबरोबर, दोन नंबरच्या धंद्यावाली, तस्कर याच्यासोबत असतात. या माणसाला वैचारिक अधिष्ठान असलेले लोक चालत नाही हा माणूस टुकार, दोन नंबरच्या धंद्यांवाल्यांमध्ये, खुनाचा आरोप असलेले असे वेगवेगळे याचे मित्र! त्याच्याकडे कोणतीही संस्कृती नाही, सुसंस्कृतपणा नाही. असे लोक तुम्हाला निलेश लंकेच्या अवतीभवती दिसतील.

पारनेरमध्ये आमदाराचा लोगो लावलेल्या दोनशे गाड्या!
आमदार विधानसभा सदस्याचा लोगो असलेल्या दोनशे गाड्या पारनेर तालुक्यात कशा काय? या गाड्यांमधून प्रवास करणारे कोण हे पारनेरकरांना माहितीय! गुंड- वाळू तस्कर आणि दोन नंबर धंद्यावाल्यांच्या गाड्यांना आमदाराचा लोगो लावला गेला! या सार्‍यांचीच चौकशी करा अशी मागणीही भोर यांनी केलीय!

… तर नगरचा बिहार झालाच म्हणून समजा!
नीलेश लंकेला जर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून आयोजन लोकसभा मतदारसंघातून संधी मिळाली तर मी जबाबदारीने सांगतो, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं बिहारपेक्षाही भयानक मतदारसंघ करेल. कारण मी त्यांच्याबरोबर राहिलोय आणि म्हणून या मतदार संघाला वाचवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. विशेष करून पारनेर तालुयातील मतदारांची, नागरिकांची आहे आणि म्हणून पारनेर बाहेरच्या तालुयातील जनतेला निलेश लंकेचं खरं रूप सांगणं हे आपलं सामाजिक कर्तव्य असल्याचे भोर यांनी स्पष्ट केले.

सुपा एमआयडीसीतील टक्केवारीत गब्बर झालेला लंके गरीब कसा?
सुपा एमआयडीसीमध्ये दगड, डबर वाळू, वीटा, मुरुम यासह अन्य कोणता धंदा असा नाही की त्यात हा पार्टनर नाही. त्यामुळे हा गरीब कसा? याचे वरकरणी दिसणारे रुप वेगळे आहे. त्याच्या मागे ईडी लावली तर निलेश लंकेचा खरा फकीरपणा बाहेर येईल. त्याला कोणी नदी मागीतली तर हा नदी सुद्धा मंजूर झाल्याचे सांगेल. सुपा एमआयडीसी धुवून खाणार्‍या नीलेश लंके याचा पैसा जातोय कुठे असा सवाल उपस्थित करतानाच त्याला काही वेगळे नाद आहेत का असा गंभीर सवालही भोर यांनी उपस्थित केला.

ट्रोलर गँग अन् गुंडांच्या गँगचा हा गँगमन!
चोर बदमाश लबाड सहकार्‍यांना संरक्षण देण्याचे काम करत आला असून त्याचा ढोंगीपणा ओळखण्याची गरज आहे. या निवडणुकीत आता यांना खासदार व्हायचंय आणि मग चार महिन्यानंतर बायकोला आमदार करायचं स्वप्न पाहत आहेत. या मतदारसंघात गुंडगिरीचं थैमान माजू पाहणारा माणसाला मत देऊन आपण मोठी चूक करू नये असे आवाहन करतानाच ट्रोलर गँग आणि गुंडांच्या गँगचा गँगमन असणारा लंके हा निवडून द्यायच्या लायकीचा नसल्याचेही भोर यांनी निदर्शनास आणून दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राष्ट्रवादी विधानसभेला एकत्र लढणार की स्वबळावर? मोठी माहिती आली समोर..

मुंबई। नगर सहयाद्री विधानसभेच्या पाश्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून रणनीती आखण्यास सुरवात झाली आहे. शिवसेना पक्षाचे...

का झाला शिर्डीत पराभव? माजी खा. लोखंडे यांनी स्पष्टच सांगितले ‘कारण’

अहमदनगर | नगर सह्याद्री अयोध्येत बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरांचा भाजपला राजकीय फायदा होणार असे गणित...

शिक्षक विधानपरिषद निवडणुकीत ‘हे’ तालुके ठरणार ‘निर्णायक’, कुणाला मिळणार आघाडी? वाचा सविस्तर..

अहमदनगर । नगर सहयाद्री- विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २६ तारखेला मतदान...

महायुतीला वेध लागले मंत्रिमंडळ विस्ताराचे? नगरमधून ‘यांच्या’ नावांची जोरदार चर्चा

मुंबई । नगर सहयाद्री- लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर विधानसभेला सामोरे जाण्यापूर्वी राज्यात महायुतीला मंत्रिमंडळ विस्ताराचे...