spot_img
अहमदनगर‘वोट जिहादचे राजकारण’ झुगारून जनता पाठबळ देईल: खा. डॉ. दिनेशकुमार शर्मा

‘वोट जिहादचे राजकारण’ झुगारून जनता पाठबळ देईल: खा. डॉ. दिनेशकुमार शर्मा

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
मतांच्या तुष्टीकरणासाठी फतवे काढून कुणी राजकारण करणार असेल तर त्याला जनता थारा देणार नाही. जनता ‘वोट जिहादचे राजकारण’ झुगारून देऊन मतांची क्रांती करून राष्ट्रवादाला पाठबळ देईल असा विश्वास उत्तरप्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे प्रभारी खासदार डॉ. दिनेशकुमार शर्मा यांनी व्यक्त केला.

खासदार दिनेश शर्मा यांनी नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदार संघाचा दोन दिवस दौरा केला. संघटनात्मक पातळीवर पदाधिकारी, कार्यकर्ते युवा वॉरियर्स यांच्याशी संवाद साधून निवडणुकीतील बारकावे त्यांनी जाणून घेतले. नगरमध्येही युवा वॉरियर्स या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

माध्यमांशी बोलताना डॉ. शर्मा म्हणाले की, राज्यात महायुतीला मोठे यश मिळणार असून २०१९ च्या विधानसभेत राज्यातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अवमान करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवेल. विरोधकांमध्ये आता कोणताही आत्मविश्वास राहिला नाही. विरोधी आघाडीतील प्रत्येक पक्षाला आपल्या अस्तित्वासाठी झगडण्याची वेळ आली आहे.  पराभव समोर दिसू लागल्याने फतवे काढून राजकारण करण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याची जोरदार टिका शर्मा यांनी केली.

फतवे काढून वोट जिहादचे राजकारण करणे हे जनतेला मान्य नाही. समाजात सांप्रदायिकता रहावी हीच भाजपाची भूमिका आहे. विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळवून देताना कधीही धर्माचा विचार करून भेद निर्माण होऊ दिला नाही. समाजातील प्रत्येक घटकांची उन्नती हाच योजना सुरू करण्यामागचा विचार आहे. पण केवळ आता मताच्या तुष्टीकरणासाठी फतवे काढले जात असतली तर सुज्ञ मतदार अशा राजकारणाला कधीही साथ देणार नाहीत. जनता राष्ट्रवादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील वोट जिहादच्या राजकारणाला मतांची क्रांती करून उत्तर देईल असा इशारा त्यांनी  दिला.उध्वव ठाकरे यांनी हिंदूत्वाचा विचार केव्हाच सोडून दिला आहे. त्यामुळे राज्यात सुरू झालेल्या फतव्यांच्या राजकारणाला विरोध करण्याची त्यांची  हिम्मत नसल्याचा टोला डॉ. शर्मा यांनी लगावला.

राहुल गांधी यांनी मतदार संघ बदलावर बोलताना डॉ, शर्मा म्हणाले की, डरो मत असे बोल होते. प्रियंका गांधी ‘मै लढती हू लढती रहुंगी’ असे देशभर सांगत होत्या मात्र निवडणुकीत त्यांची भूमिका ही केवळ राजकीय पर्यटनाची असून निवडणुका झाल्या की त्या लगेच रोम आणि इटलीत दिसतील अशी खोचक प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

डॉ. दिनेश शर्मा यांनी सकाळी नगरमध्ये आल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत चर्चा केली. या प्रसंगी आमदार मोनिका राजळे तसेच  प्रदेशातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते. उभयनेत्यांमध्ये मतदार संघातील निवडणुकीच्या प्रचाराबाबत सखोल चर्चा झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...