spot_img
महाराष्ट्रआंदोलन पेटले ! अजित पवार गटाच्या 'या' आमदाराच्या घराची जाळपोळ

आंदोलन पेटले ! अजित पवार गटाच्या ‘या’ आमदाराच्या घराची जाळपोळ

spot_img

बीड / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असणारे आंदोलन आता हिंसक होऊ लागले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांनी टिपण्णी केली होती. याचा राग आल्याने आज हजारो आंदोलकांनी एकत्र येत बीडमधील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांच्या वाहनांवर दगडफेक करत जाळपोळ केली.

बंगल्याचीही तोडफोड करण्यात आलेली आहे. ही घटना आज सोमवारी (ता. ३०) घडलेली आहे. माजलगाचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल केलेल्या वेगळ्याच वक्तव्याची कथीत ऑडीओ क्लीप समोर आल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले.

आज सकाळी त्यांच्या माजलगावच्या बंगल्यासमोर हजारो लोक जमले. लोकांनी  बंगल्यावर दगडफेक केली. त्यानंतर आंदोलकांनी गेट उघडून आतमध्ये प्रवेश केला व चारचाकी वाहनांना आग लावली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी तेथे अग्नीशमन वाहने आली. त्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आल्याचे वृत्त आहे.

कोल्हापूरमध्ये आंदोलनात राडा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता राज्यभरामध्ये मराठा बांधवांकडून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. अनेक ठिकाणी रास्तारोका, रस्त्यावर टायर जाळून आंदोलनं केली जात आहेत. या आंदोलनादरम्यान संतप्त मराठा आंदोलक आमदारांच्या घरावर दगडफेक, गाड्यांची तोडफोड करत आहेत. अशामध्ये कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांत कार्यासमोर एक दिवशी लाक्षणीक उपोषण करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी एसटी बसवरच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टरला काळे फासले. पोलिसांनी या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिस आणि आंदोलनांमध्ये झटापट झाली. तसंच, या उपोषणस्थळी स्टेजवरच उपोषणकर्त्यामध्ये आंदोलन करण्यावरून वादावादीचा झाल्याचा प्रकार देखील घडला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...

मुहूर्त ठरला; शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ‘या’ तारखेला ‘सर्वोच्च’ सुनावणी

मुंबई । नगर सहयाद्री:- शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या पारंपरिक निवडणूक चिन्हाच्या मालकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेल्या दोन...

विधानसभेत गरजला पारनेरकरांचा आवाज! आ. दाते यांनी मांडला ‘तो’ प्रश्न; वेधले शासनाचे लक्ष

पारनेर । नगर सहयाद्री :- पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागात दि...

श्रीराम चौकातील मावा बनवणाऱ्या कारखान्यांवर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री नगर शहरात सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यांवर अहिल्यानगर...