spot_img
महाराष्ट्रमोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खूपच खालावली, स्टेजवरच कोसळले..

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खूपच खालावली, स्टेजवरच कोसळले..

spot_img

जालना / नगर सह्याद्री : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलनाला बसले आहे. त्यांचा आजचा सहावा दिवस आहे. ते पाणीही घेत नाहीयेत. परंतु आज त्यांची तब्येत खालावली आहे. ते आज स्टेजवरच कोसळल्याचा व्हिडीओ समोर येत आहे.

अंतरावाली-सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांच आमरण उपोषण सुरु असून अन्न-पाणी सोडलय. त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर गंभीर परिणाम झाला आहे. स्टेजवर उभे असताना ते कोसळले. त्यामुळे आंदोलनात जमलेले ग्रामस्थ आक्रमक झाले होते. एक मराठा-लाख मराठा या घोषणा दिल्या.

मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्याचे आवाहन ग्रामस्थ करत आहेत. लवकरच ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. आज सकाळपासून ते झोपून आहेत. कालही त्यांनी माइक हातात घेतला तेव्हा त्यांचा हात थरथरत होता.

‘पाणी घ्या, पाणी घ्या, जरांगे पाटील पाणी घ्या’ अशी घोषणाबाजी गावकऱ्यांकडून सुरु आहे. त्यांच्यासाठी एक मुलगी पाण्याची बाटली घेऊन आली आहे, पण मनोज जरांगे पाटील यांनी पाणी घेतलेले नाही. मनोज जरांगे पाटील हे उपचारही घेत नाहीत. “समाजाच तुम्हाला ऐकावच लागेल. आज तुम्हाला पाणी प्यावच लागेल असा आवाज समोर असलेल्या गर्दीतून आला. त्यावर ठिकय, मी चार-पाच घोट पाणी पीतो” असं जरांगे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...

नगरमध्ये चाललंय काय? दोन दिवसात ‘इतक्या’ अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह मुलाचे अपहरण केल्याच्या...

गोदावरीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पहा कुठे काय परस्थिती?

नाशिक । नगर सहयाद्री :- नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून...