spot_img
अहमदनगर'मिरजगाव डॉक्टर असोसिएशन'चा मराठा आरक्षण आंदोलनास जाहीर पाठिंबा

‘मिरजगाव डॉक्टर असोसिएशन’चा मराठा आरक्षण आंदोलनास जाहीर पाठिंबा

spot_img

मिरजगाव / नगरसह्याद्री :
मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. तसेच महाराष्ट्रातून बहुतांश ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. आता अहमदनगरमधील अनेक डॉक्टर संघटना देखील या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. मिरजगाव येथील डॉक्टर असोसिएशन यांनी देखील आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

मिरजगाव येथील डॉक्टर असोसिएशन यांनी आज (मंगळवार) दुपारनंतर सर्व हॉस्पिटल बंद ठेवून मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा उभारला आहे तो समाजासाठी हिताचा आहे. त्याचा फायदा भावी पिढीला नक्कीच होईल असा विश्वास यावेळी डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. शासनाने आता समाजाचा जास्त अंत पाहू नये अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असे मत यावेळी डॉ. सुभाष सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

यावेळी डॉ. विलास कवळे, डॉ. संजय कोल्हे, डॉ. चंद्रकांत कोरडे, डॉ. दीपक बावडकर, डॉ. अनिल मापारी, डॉ. प्रसाद शिंदे, डॉ. अशोक काळदाते , डॉ. रामदास टकले, डॉ. दिगंबर पुराणे, डॉ. शिवाजी पाबळे, डॉ. अशोक सूर्यवंशी, डॉ. विनोद उदमले, डॉ. प्रशांत आंबुले, डॉ. संतोष बोरुडे, डॉ. योगेश बोरुडे आदी डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

मुंबई। नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर...

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये...

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी...

शेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ वनस्पती, शेकडो महिलांनी कमवलेत लाखो रुपये

नगर सह्याद्री टीम : Lemongrass Farming : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवायचा असतो आणि...