spot_img
अहमदनगर'आ. तांबे म्हणजे सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बोलणारा एकमेव लोकप्रतिनिधी', पहा कुणी व्यक्त केल्यात...

‘आ. तांबे म्हणजे सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बोलणारा एकमेव लोकप्रतिनिधी’, पहा कुणी व्यक्त केल्यात ‘या’ भावना

spot_img

घुलेवाडी / नगरसह्याद्री
राज्यातील जनतेसमोर शिक्षण, रोजगार, आरोग्य आदी क्षेत्रांमधील विविध प्रश्न ‘आ’ वासून उभे आहेत. मात्र या मूलभूत प्रश्नांवर कोणताही लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाही. अशा वेळी पदवीधर मतदारसंघातून निवडून दिलेले आ. सत्यजीत तांबे हे एकमेव आमदार या प्रश्नांना विविध व्यासपीठांवर वाचा फोडताना दिसतात, अशी भावना घुलेवाडी परिसरातील मतदारांनी व्यक्त केली.

घुलेवाडी, जवळे कडलग, वेल्हाळे, राजापूर, सायखिंडी या भागात सोमवारी आ. सत्यजीत तांबे यांनी आभार दौरा केला. यावेळी नागरिकांनी ही भावना बोलून दाखवली. आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा आ. सत्यजीत तांबे यांनी याच जिल्हा परिषद गटातून केला. 2007 ला सत्यजीत तांबे याच घुलेवाडी भागातून जिल्हा परिषदेवर निवडून आले होते.

त्यामुळे घुलेवाडी, जवळे कडलग, सायखिंडी, राजापूर, वेल्हाळे हा भाग आ. सत्यजीत तांबेंसाठी अगदी खास आहे. पदवीधर निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर आ. तांबे यांनी पाचही जिल्ह्यांतील 54 तालुक्यांत आभार दौरा करत लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा धडाका लावला. सोमवारी त्यांनी घुलेवाडी भागात येत सर्व मतदारांचे आभार मानले.

घुलेवाडीशी खास नातं
आपण कितीही गगनभराऱ्या घेतल्या, तरी आपल्या पहिल्या उडीचं कौतुक नेहमीच असतं. राजकारणाचा श्रीगणेशा मी घुलेवाडीतूनच केला. २००७ मध्ये मी विद्यार्थी चळवळीतून सक्रीय राजकारणात येण्यासाठी जिल्हा परिषद निवडणूक लढवली, त्या वेळी इथल्याच लोकांनी माझ्यावर भरभरून प्रेम करत निवडून दिलं होतं. तेव्हापासून त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास जपत वाटचाल करण्याचा मी प्रयत्न करत आहे. या घुलेवाडी भागाशी माझं खूप जवळचं नातं आहे. इथला प्रत्येक माणूस मला माझ्या कुटुंबासारखा आहे. त्यामुळे आज इथे आल्यावर घरी आल्यासारखंच वाटलं. मी आभार मानायला नाही, तर तुमचे आशीर्वाद घेऊन आणखी चांगलं काम करण्यासाठी ऊर्जा मिळवायला आलो आहे. : आ. सत्यजीत तांबे

आ. सत्यजीत तांबे म्हणजे सर्वसामान्यांचा आवाज
या दौऱ्यादरम्यान आ. सत्यजीत तांबे यांनी जवळपास प्रत्येक कुटुंबाची विचारपूस केली. त्यांच्याकडून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या या कृतीमुळे लोकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं. जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून दादांनी आमच्या अनेक प्रश्नांवर तोडगा काढला. आता ते आमदार झाले म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचेल, असा विश्वास येथील मतदारांनी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगर ब्रेकिंग ! गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपीवर हल्ला, माळीवाड्यात पोलिसांचा फौजफाटा

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगरच्या बालिकाश्रम रोड परिसरात काही दिवसांपूर्वी ओंकार उर्फ...

Ahmednagar: शहरासह जिल्ह्यात जोर ‘धार’

रस्त्यांवर अर्धाफुट पाणी; नगरकरांची अक्षरश: त्रेधातिरपीट अहमदनगर | नगर सह्याद्री मागील रविवारपासून अवकाळीचा तडाखा जिल्ह्याला बसत...

Ahmednagar: पत्र आले आमदारांचे, ‘माफी’ सूचली प्रशासनाला

शास्तीच्या रकमेत सवलत देण्याची परंपरा कायम ः आता प्रतिसादाकडे लक्ष अहमदनगर | नगर सह्याद्री आमदारांनी पत्र...

Parner: खासदार विखे शेतकऱ्यांच्या बांधावर! म्हणाले, शेतकऱ्यांना..

पारनेर। नगर सह्याद्री- तालुक्यातील महसूल व कृषी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करताना कोणत्याही अडचणी येऊ...