spot_img
अहमदनगरबापरे! श्री साई समर्थ एग्रो एजन्सीला भीषण आग; आगीत ७० ते ८०...

बापरे! श्री साई समर्थ एग्रो एजन्सीला भीषण आग; आगीत ७० ते ८० लाखांचे…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री –
नगर बाजार समिती परिसरातील नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या इमारतीतील श्री साई समर्थ एग्रो एजन्सीला आग लागून ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना १४ नोव्हेंबर रोजी पहाटे घडली. या प्रकरणी तत्काळ आग आटोयात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. आग त्वरित आटोयात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. ऐन दिवाळीच्या सणासुदीत ही घटना घडल्याने व्यापारी वर्गात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले यांचे बंधू दौलत कार्ले यांचे हे दुकान आहे.

कार्ले नेहमीप्रमाणे सोमवारी (दि. १३) रात्री दुकान बंद करून खंडाळा या गावी गेले. मंगळवारी दिवाळी पाडवा सण होता. या सणाच्या दिवशीच श्री साई  समर्थ एग्रो एजन्सी या दुकानाला पहाटे आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अतुल कराळे यांनी ही बाब श्री साई समर्थ एजन्सीतील तील बबन बोरुडे यांच्या निदर्शनास आणून दिली.

बोरुडे यांनी तत्काळ कार्ले कुटूंबियांना याबाबतची माहिती दिली. परंतु, जि.प. सदस्य संदेश कार्ले व त्यांचे बंधू दौलत कार्ले हे बुलढाणा येथील साकी येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्ले बंधू प्रविण कार्ले व त्यांच्या मित्र मंडळींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान बोरुडे यांनी अग्निशमक दलाला घटनेची माहिती कळवली.

अग्निशमन दल एका बंबासह त्वरित घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या अर्ध्या तासातच आग आटोयात आणण्यात यश आले. आगीत विविध प्रकारच्या कंपनीची औषधे, बी बियाणे आदी वस्तू जळून खाक झाल्या. सुमारे ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज संचालिका शीतल प्रविण कार्ले यांनी व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! प्रियकराच्या घराबाहेर तृतीयपंथीयाची आत्महत्या

पुणे । नगर सहयाद्री:- पुण्यातील तृतीयपंथीयाला जयपूरचा तरूण आवडला. दोघांमधले प्रेम बहरले. ते दोघेही...

नैतिकता : धनुभाऊंना नाहीच; अजितदादा तुम्हाला? धनंजय मुंडेंना किती दिवस पोसणार?, चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!

खंडणीखोर मुकादम, बेभान कार्यकर्ते, सत्तेचा माज असणारे नेते अन्‌‍ टुकार चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!सारिपाट...

ट्रक दरीत कोसळून 10 जण ठार; कुठे घडला भयंकर अपघात!

नवी दिल्ली | नगर सह्याद्री:- कर्नाटकमध्ये बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक...

महाराष्ट्राच्या हाती मोठं घबाड! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात काय-काय घडलं?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी; सव्वासहा लाख कोटींवर गुंतवणूक करार मुंबई | नगर...