spot_img
महाराष्ट्रआज ओबीसींची भव्य सभा ! भुजबळांसह पडळकरांपर्यंत कोण काय बोललं? पहा..

आज ओबीसींची भव्य सभा ! भुजबळांसह पडळकरांपर्यंत कोण काय बोललं? पहा..

spot_img

जालना / नगर सहयाद्री : राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलंच तापला आहे. मराठा आरक्षणासाठी एकीकडे रान पेटलेले असताना आज ओबीसी आरक्षण बचावासाठी राज्यातील सर्व पक्षीय ओबीसी नेते एकत्र आले. त्यांनी जालन्यातील अंबड येथे सभा घेतली.

यावेळी विविध नेत्यांनी राजकीय वक्तव्य केली. यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीस सरकारने मराठा आरक्षण कायदा मांडला त्यावेळी हात वर करून मत दिल होत असं सांगितलं. तसेच मराठा समाजच्या आरक्षणासाठी आमचा विरोध नाही असं ते म्हणाले. यावेळी भाजप नेते गोपीचंद पडळकर देखील आक्रमक झाले होते.

ओबीसीच्या मूळावर उठणाऱ्यांविरोधात एकजूट दाखवा. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. ओबीसींनी एकजूट कायम ठेवावी अशी मागणी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली. माळी, धनगर, वंजारी समाज म्हणजे माधवला एकत्र केल तर महाराष्ट्र जिंकल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी नेत्यावर कोणी बोट दाखवले तर आम्ही हात दाखवल्याशिवाय राहणार नाही,

आजपासून घोषणा द्या, एक ओबीसी, एक कोटी ओबीसी ! इथून पुढे महाराष्ट्रात ओबीसी आंदोलनचा वणवा पेटवायचा आहे असे वक्तव्य भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी जालना मेळाव्यात केले आहे.

दरम्यान जालना येथील ओबीसीच्या एल्गार मेळाव्याला पंकजा मुंडे अनुपस्थित राहिल्या. व्यासपीठावर मात्र त्यांची छायाचित्रे लावण्यात आली होती. लोकनेते गोपीनाथ मुने यांचे फोटोही यावेळी लक्ष वेधून घेत होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...