spot_img
अहमदनगरबापरे! श्री साई समर्थ एग्रो एजन्सीला भीषण आग; आगीत ७० ते ८०...

बापरे! श्री साई समर्थ एग्रो एजन्सीला भीषण आग; आगीत ७० ते ८० लाखांचे…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री –
नगर बाजार समिती परिसरातील नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या इमारतीतील श्री साई समर्थ एग्रो एजन्सीला आग लागून ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना १४ नोव्हेंबर रोजी पहाटे घडली. या प्रकरणी तत्काळ आग आटोयात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. आग त्वरित आटोयात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. ऐन दिवाळीच्या सणासुदीत ही घटना घडल्याने व्यापारी वर्गात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले यांचे बंधू दौलत कार्ले यांचे हे दुकान आहे.

कार्ले नेहमीप्रमाणे सोमवारी (दि. १३) रात्री दुकान बंद करून खंडाळा या गावी गेले. मंगळवारी दिवाळी पाडवा सण होता. या सणाच्या दिवशीच श्री साई  समर्थ एग्रो एजन्सी या दुकानाला पहाटे आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अतुल कराळे यांनी ही बाब श्री साई समर्थ एजन्सीतील तील बबन बोरुडे यांच्या निदर्शनास आणून दिली.

बोरुडे यांनी तत्काळ कार्ले कुटूंबियांना याबाबतची माहिती दिली. परंतु, जि.प. सदस्य संदेश कार्ले व त्यांचे बंधू दौलत कार्ले हे बुलढाणा येथील साकी येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्ले बंधू प्रविण कार्ले व त्यांच्या मित्र मंडळींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान बोरुडे यांनी अग्निशमक दलाला घटनेची माहिती कळवली.

अग्निशमन दल एका बंबासह त्वरित घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या अर्ध्या तासातच आग आटोयात आणण्यात यश आले. आगीत विविध प्रकारच्या कंपनीची औषधे, बी बियाणे आदी वस्तू जळून खाक झाल्या. सुमारे ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज संचालिका शीतल प्रविण कार्ले यांनी व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...