spot_img
अहमदनगरअनेक इच्छुकांचा हिरमोड पारनेर तालुक्यातील 'या' ५८ ग्रामपंचायतीत येणार 'महिलाराज'

अनेक इच्छुकांचा हिरमोड पारनेर तालुक्यातील ‘या’ ५८ ग्रामपंचायतीत येणार ‘महिलाराज’

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, भाळवणी, राळेगण थेरपाळ, ढोकी, जवळा, राळेगणसिद्धी, वडझिरे, दैठणे गुंजाळ, पानोली, वडगाव सावताळ, पळशी यांसह 58 गावांत महिलांसाठी आरक्षण निघाले आहे. ग्रामपंचायतीत महिलाराज येणार असल्यामुळे अनेक मातब्बर राजकीय इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

पारनेर तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत पारनेर येथील इंदिरा भवन सभागृहात प्रांत अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व तहसीलदार गायत्री सौंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शुक्रवार दिनांक 25 रोजी तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण महिला व पुरुष वर्गवारीनुसार जाहीर झाले.

यामध्ये अनुसूचित जातींसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 8, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 31 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 69 सरपंच पदे आरक्षित करण्यात आले होते. यामध्ये महिलांसाठी 50% टक्के आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतमध्ये महिलाराज येणार आहे. आळकुटी, कान्हूर पठार, कर्जुले हर्या, वासुंदे, गोरेगाव, ढवळपुरी, वाडेगव्हाण, नारायण गव्हाण, या गावांमध्ये आरक्षण खुले झाल्यामुळे इच्छुकांची मोठ्या प्रमाणात भाऊ गद पाहायला मिळणार आहे.

सरपंच पदासाठी गावनिहाय पडलेले आरक्षण- अनुसूचित जाती :-
पिपंळनेर (महिला), माळकूप (महिला), अस्तगाव (महिला), राजणगाव मशीद, जामगाव, किन्ही

अनुसूचित जमाती :-
भाळवणी (महिला), गुणोरे (महिला), म्हसणे(महिला), वडगाव आमली (महिला), निघोज, लोणी हवेली, म्हस्केवाडी, म्हसे खुर्द.

नागरिकांच्या मागास प्रवर्ग :-
राळेगण थेरपाळ, आपधूप, भोंद्रे, ढोकी, गारगुंडी, गारखिंडी, जावधवाडी, जातेगाव, जवळा, कारेगाव, करुंद, पाडळी रांजणगाव, पळशी, राळेगण सिद्धी, यादववाडी, वडझिरे ही गावे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाली आहेत. तर चोंभूत, गटेवाडी, काळकूप, खडकवाडी, पळवे बु. पठारवाडी, पुणेवाडी, रायतळे, शेरी कासारे, सुपा, वनकुटे, वडुले, वाघुंडे खुर्द, विरोली, बाबुड ही गावे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत.

सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) :-
वडनेर हवेली, अक्कलवाडी, चिंचोली, दैठणे गुंजाळ, देवीभोयरे, डिकसळ, घाणेगाव, हंगा, हिवरे कोरडा, कडूस, काकणेवाडी, कळस, कासारे, काताळवेढा, मांडवे खुर्द, म्हसोबा झाप, मुंगशी, पाडळी दर्या, पानोली, पिंप्री गवळी, पिंप्री जलसेन, पिंप्री पठार, रांधे, रेणवडी, रुईछत्रपती, सारोळा आडवाई, शहाजापूर, शिरापूर, टाकळी ढोकश्वर, तिखोल, वडगाव सावताळ, वडनेर बु., वारणवाडी, वेसदरे, वाघुंडे बु.

सर्वसाधारण प्रवर्ग:-
अळकुटी, बाभुळवाडे, भांडगाव, भोयरे गांगर्डा, दरोडी, देसवंडे, ढवळपुरी, धोत्रे बु. गांजीभोयरे, गोरेगाव, हत्तलखिंड, कान्हूर, करंदी, कर्जुले हर्या, कोहोकडी, लोणी मावळा, मावळेवाडी, नांदूर पठार, नारायण गव्हाण, पाडळी आळे, पाडळी कान्हूर, पळसपूर, पळवे खुर्द, पिंपळगाव रोठा, पिंपळगाव तुर्क, पोखरी, सांगवी सुर्या, सावरगाव, सिद्धेश्वरवाडी, वाडेगव्हाण, वडगाव दर्या, वाळवणे, वासुंदे, पाबळ आदी.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...