spot_img
ब्रेकिंगमनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, त्यांना..

मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, त्यांना..

spot_img

जालना। नगर सह्याद्री-
मराठा आरक्षणाची मागणी करणारे मराठा यॊद्धा यांची प्रकृती बिघडली असल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या छातीत दुखू लागलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर आंतरवली सराटीत उपचार सुरु करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजी नगर मधल्या खासगी रुग्णालयातले डॉक्टर आंतरवली सराटीत पोहचले आहेत.

मागच्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना बरं वाटू लागल्याने शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. शुक्रवार दि. १० वाजता रात्री मनोज जरांगे यांची अचानक प्रकृती बिघडली त्यानंतर रात्री १.३० च्या सुमारास मनोज जरांगेंचा ईसीजी काढण्यात आला.

ईसीजी नॉर्मल असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना रात्री उशिरा सलाईन लावण्यात आले आहेत. आता त्यांची प्रकृती ठीक असून मनोज जरांगेंना अॅसिडीटी होऊ लागल्याने छातीत दुखू लागल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...

महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ – मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?

मुंबई / नगर सह्याद्री - Weather Update: देशभरात सध्या हवामान वेगाने बदलताना दिसतंय ....

निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेत फेरबदल; जिल्हाप्रमुखपदी कुणाची निवड?

लोकसभा संघटकपदी गाडे, दक्षिण जिल्हाप्रमुखपदी दळवी, महानगर प्रमुखपदी काळे यांच्या निवडी अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना...

पारनेर नगराध्यक्षपदाच्या निवडीत दडपशाही; महायुतीचे पत्रकार परिषदेत आरोप, हंगा वरून कारभार पाहणाऱ्यांना धडा शिकवणार!

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा...