अहमदनगर। नगर सहयाद्री-
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी गंभीर आरोप करणारे अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरूवारी (दि. २९) दुपारी साडेतीनच्या सुमारास सदर घटना घडली. याप्रकरणी सायंकाळी किरण साहेबराव बारस्कर (वय ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल शिवाजी घोलप (रा. घोलप वस्ती, निंबळक ता. नगर), स्वप्नील चव्हाण, करण मापारी, अक्षय व सुरज शेवाळ (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. नगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरूवारी दुपारी किरण बारस्कर हे त्यांच्या घरी झोपलेले असताना त्यांना आरडाओरडा करण्याचा व शिवीगाळ केल्याचा आवाज आला, तेव्हा त्यांनी घराच्या खिडकीजवळ जाऊन पाहिले पाच जणांनी अजय महाराज व कुटुंबाला शिवीगाळ केली. अजय महाराज घरी आले तर त्यांना जीवंत ठार मारू, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.