spot_img
अहमदनगरजिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत कोहकडी शाळेचे यश

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत कोहकडी शाळेचे यश

spot_img

नेवासे : जिल्हा परिषदेच्या कोहकडी प्राथमिक शाळेच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. कबड्डी व खो खो (मुली लहान गट) स्पर्धेत प्रथम, खो खो मध्ये (मुले मोठा गट) प्रथम, खोखो मध्ये (मुली मोठा गट) द्वितीय क्रमांक मिळवला.

अहमदनगर जिल्हा परिषद, प्राथमिक शिक्षण विभाग आयोजित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल, नेवासा फाटा येथे पार पडल्या. शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते.

इयत्ता पहिली ते पाचवी (लहान गट) व इयत्ता सहावी ते आठवी (मोठा गट) सांघिक प्रकारात कबड्डी, खो खो तर वैयक्तिक क्रीडा प्रकारांत धावणे, लांब उडी, उंच उडी, थाळी फेक, गोळा फेक क्रीडा प्रकारांत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळांनी सहभाग घेतला.

अहमदनगरमधील जिल्हा परिषदेच्या कोहकडी प्राथमिक शाळेच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत खो खो व कबड्डी या सांघिक क्रीडा प्रकारात यश मिळवले. कोहकडी शाळेकडून सोनाली टकले, खुशाली टकले, साक्षी गोगडे, कल्पना कोळेकर, शिवांजली धरणे, चैताली कोकरे, पूनम कोकरे, रोहिणी करगळ, काजल खंडेकर, शकुंतला टकले, आनंद माने, पृथ्वीराज जाधव, साईराज चौधरी, समीर शिंदे, राजू टकले आदींनी उत्कृष्ट खेळ केला.

यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक गोकुळ कळमकर, राजेंद्र वाबळे, संतोष गाजरे, कमलेश थोरात, उज्ज्वला काळे, आशा आननकर, वैशाली औटी आदींचे मार्गदर्शन लाभले. कोहकडी शाळेच्या खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माजी सभापती सुदामराव पवार, शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र कापरे, भाऊसाहेब काळे, विनेश लाळगे, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, संजय शेळके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित ढवण, केंद्रप्रमुख चांगदेव गवळी, प्रभारी मुख्याध्यापक संगीता देशमुख आदींनी अभिनंदन केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...

कांद्याची महाबँक: उल्लू बनविणारा प्रयोग!अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना गंडवले

अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना...

बागुल पंडुगू सण तुम्हा माहित आहे का? नगरमध्ये केला जातो उत्साहात साजरा

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर शहरात बागुल पंडुगू सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तोफखाना...