पारनेर / नगर सह्याद्री : आपधुप गावातील जडण घडणीत झावरे कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. आपधुपच्या विकासासाठी झावरे कुटुंबीय नेहमीच अग्रेसर असते असे प्रतिपादन माजी सरपंच जयसिंग गवळी यांनी केले.
आपधुप येथे सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या प्राथमिक शाळा परिसरात पेव्हींग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा प्रारंभ सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गवळी बोलत होते.
गवळी यावेळी म्हणाले, आपधुप गावामध्ये विविध विकासकामे स्व. माजी आ.वसंतराव झावरे पाटील यांच्या माध्यमातून तसेच सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून झाली. त्यांच्या माध्यमातून गावामध्ये ५० लाख रुपयांची दोन एक कोटी रुपयांचे एक असे तीन मोठे बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यांमुळे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होत आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना झावरे यांनी श्री.खंडेश्वर देवस्थानचा ‘क’ वर्गात समावेश करुन मंदिर व परिसर सुशोभिकरण केले असे ते म्हणाले. यावेळी किसनराव गवळी, विद्यमान सरपंच मीनाक्षी गवळी यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपसरपंच शितल गवळी, नामदेव गवळी, संतोष गवळी, अरुण गवळी, सचिन गवळी, गणेश गवळी, अशोक गवळी, योगेश गवळी, गोकुळ गवळी, दत्तात्रय गवळी, रामचंद्र गवळी, लक्ष्मण गवळी, दीपक खोसे, बजरंग गवळी, सचिन कसबे, रघुनाथ खोसे, रभाजी खोसे, वसंत गवळी, नवनाथ गावडे, गणेश शिंदे, रामनाथ गवळी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक वर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.