spot_img
अहमदनगरAhmednagar Breaking : नगर शहरात थरार, कामगाराने केला ठेकेदाराचा खून

Ahmednagar Breaking : नगर शहरात थरार, कामगाराने केला ठेकेदाराचा खून

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगर जिल्ह्यात विविध धक्कादायक गुन्हेगारी घटना घडत आहेत. आता नगर शहरामधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कामगाराला शांत बसा असे म्हटल्याचा राग आल्याने कामगाराने ठेकेदाराचा चाकूने भोकसून खून केला आहे.

सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवरील पारीजात चौक परिसरात असलेल्या तांबटकर मळा येथे ही घटना घडली. गुरुवारी (दि.२८) रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला असून कमलेश कुशावह (रा. नवाबगंज, उत्तर प्रदेश, हल्ली रा. तांबटकर मळा, पारीजात चौक, गुलमोहर रोड) असे मयताचे नाव आहे. बिंदाप्रसाद कालीदीन रावत असे आरोपीचे नाव आहे.

मयत कमलेश कुशावह हे विविध कामासाठी कामगार पुरविण्याचे काम करत होते. ते उत्तरप्रदेश मधून नगरमध्ये ४ वर्षांपूर्वी कामासाठी आलेले होते. ते सध्या तांबटकर मळा येथे त्यांचे गावाकडील चांद आलमनुर आलम खान यांचे सिमेंट ब्लॉक, कंपाउंड वगैरे तयार करण्याचे काम करत होते. त्यांचे सोबत त्यांनी त्यांच्या गावाकडून आणखी काही मजुर कामाला होते. त्यामधे आझाद खान, संदिप कुमार, रामबाबु सिंग, अक्रम असे कामावर आहेत. सुमारे सात आठ महिन्यापासून बिंदाप्रसाद कालीदीन रावत हादेखील त्यांसोबत काम करत आहे.

गुरुवारी (दि.२८) रात्री १०.३० च्या सुमारास कमलेश, त्यांची पत्नी व मुलांनी जेवण केले व नातेवाईकाचा फोन आल्याने ते फोनवर बोलत होते. तेव्हा बिंदाप्रसाद कालीदीन रावत हा तेथे आला व मोठयाने बोलू लागला. तेव्हा कमलेश यांनी त्यास आम्ही फोनवर बोलत आहोत. तू शांत बस असे सांगितले.

यावेळी तो शिवीगाळ करू लागला. यावेळी कमलेश यांनी बिंदा यास तुला आमच्याकडे काम करायचे नसेल तर ऍडव्हान्स घेतलेले पैसे देऊन टाक असे सांगितले. याचा राग आल्याने बिंदाप्रसाद याने कमलेश यांना चाकूने भोकसले. आरडा ओरडा ऐकून अन्य कामगार तेथे आले. त्यांनी बिंदाप्रसाद कालीदीन रावत यास पकडून ठेवले व कमलेश यांस औषधोपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी कमलेश यांना मयत घोषित केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....

नगरमधील तीन युवकांचा मृत्यू; तिरुपतीवरुन परत येतांना नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्हयातील शेवगाव येथील युवकांच्या अपघताचे वृत्त समोर आले...

आमदार संजय गायकवाडांचा राडा; कँटिन ऑपरेटरला लाथा-बुक्क्‌‍यांनी मारहाण, कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड...