नगर सह्याद्री टीम : कायनेटिक कंपनीची लुना ही बाजारात अनेक वर्ष अधिराज्य गाजवणारी बाईक ठरली. एक काळ असा होता की, सर्वत्र कायनेटिक लूनाच दिसत असत. शहरीच नाही तर ग्रामीण भागातही हा फिरण्याचा एक स्वस्त पर्याय होता. 1970-80 च्या दशकात लूनाला केवळ 2000 रुपयांच्या किंमतीत बाजारात आणले होते. त्यामुळे त्याकाळी ही बाईक प्रचंड गाजली. आता हीच लुना ई-बाईकच्या रुपात पुन्हा धावताना दिसणार आहे.
kinetic Green
आता कंपनीने kinetic Green च्या बॅनरखाली ई-लूना लाँच करण्याची तयारी केली आहे. लूना पुन्हा एकदा भारतीय रस्त्यावर धावताना दिसेल.
ई-लूनाची किंमत
कायनेटिक ई-लूनाचे बुकिंग 26 जानेवारीपासून देशभरात सुरु होत आहे. कंपनी याच दिवशी या लूनाचा लूक समोर आणेल. तर ई-लूना 50 किमी प्रति तासचा सर्वाधिक वेग देईल. ग्राहक लूना खरेदी करताना फेम-2 स्कीम अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊ शकतील. ही लूना 82000 रुपयांच्या जवळपास बाजारात दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.