spot_img
महाराष्ट्रशिष्टमंडळाच्या बैठकीत तोडगा नाहीच ! मनोज जरांगे मुंबईत येण्यावर ठाम, आझाद मैदानावरील...

शिष्टमंडळाच्या बैठकीत तोडगा नाहीच ! मनोज जरांगे मुंबईत येण्यावर ठाम, आझाद मैदानावरील आंदोलनाची परवानगीही नाकारली

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील २६ जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. आज जरांगे पाटील यांचा ताफा लोणावळ्यात पोहोचला आहे, तर दुसरीकडे सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांच्यासोबत बैठक घेतली, पण ही बैठक निष्फळ ठरली आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोनाला येण्यासाठी ठाम असल्याची माहिती मिळाली आहे.

“शिष्टमंडळाच्या बैठकीत ५४ लाख नोंदीबाबत चर्चा झाली आहे. सग्या सोयऱ्यांच्याबाबत चर्चा झाली. बैठकीत ते म्हणाले, याबाबत आता अध्यादेश काढण्याचे काम सुरू आहे. मग मी त्यांना म्हणालो, आम्ही मुंबईकडे निघालो आहे. आंदोलन आम्ही थांबवणार नाही, असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जरांगे पाटील यांच्यासोबतची ही बैठक निष्फळ ठरली आहे. जरांगे पाटील आंदोनवार ठाम आहेत. आता आझाद मैदानावर आम्ही आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

* उपोषणाला आझाद मैदानात परवानगी नाकारली
दरम्यान लाखो मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील लोणावळ्यापर्यंत आले आहेत. दरम्यान, आता मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात परवानगी नाकारली आहे. काल हायकोर्टात या आंदोलनाबाबत एक सुनावणी झाली या सुनावणीत हायकोर्टाने मुंबई पोलिसांना याबाबत आदेश दिले होते. आता पुढे आंदोलक काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...