spot_img
महाराष्ट्रआता चाललो मुंबईला !! आरक्षणाशिवाय माघार नाही, जरांगेंची लोणावळ्यात मोठी घोषणा

आता चाललो मुंबईला !! आरक्षणाशिवाय माघार नाही, जरांगेंची लोणावळ्यात मोठी घोषणा

spot_img

लोणावळा / नगर सह्याद्री : मनोज जरांगे पाटील यांनी आता लोणावळ्यातून मुंबईला जाण्याची घोषणा केली आहे. पोलिसांनी आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या आंदोलकांना परवानगी नाकारली असली तरी त्यांनी ही घोषणा आता केली आहे.

वाटेत शिष्टमंडळ भेटण्यासाठी येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. जरांगेंनी मुख्यमंत्र्यांनी, दोन उपमुख्यमंत्र्यांनी यावे असे आवाहन करत आपण दुपारपर्यंत लोणावळ्यात थांबल्याचे स्पष्ट केले होते. मला मुंबईला यायची हौस नाहीय. इथेच आरक्षण मिळाले तर तिकडे येऊन काय करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान त्यांनी आंदोलकांना सावधही केले आहे. ते म्हणालेत की, मोर्चात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला थेट पोलिसांच्या ताब्यात द्या. हे लोक काहीही करू शकतात, मोर्चात घुसू शकतात सावध रहा असे ते म्हणाले आहेत. मी नोटीसीवर सही केली. कोर्टाची होती म्हणून केली आहे. माझे नाव कसे असे विचारले असता तुम्ही प्रमुख म्हणून तुम्हाला नोटीस दिल्याचे सांगितले. काही हरकत नाही. मी आता मुंबईला निघालो आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! २१०० रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे....

आयुक्त साहेब, चमकोगिरी नको फिल्डवर काम दाखवा; कोतकर काय म्हणाले पहा…

मनोज कोतकर | मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट | आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहरात भटया...

कापडबाजारातील अतिक्रमण हटवा; अहिल्यानगर हिंदू समाज आक्रमक, दिला ‘हा’ इशारा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - कापड बाजार, घास गल्ली, मोची गल्लीतील अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी...

धक्कादायक! नगर शहरात खासगी ट्राफीक शाखा!; पालकमंत्री, आ. जगताप यांच्या नाकावर टिच्चून लाखोंची वसुली!

एसपी साहेब, 'बोरसे' कडून होतोय तुमच्या नावाचा गैरवापर | 'तानवडे'सह अनेक खासगी एजंटांमार्फत बोरेसेची...