spot_img
महाराष्ट्रजरांगे पाणी पिले, रात्रभर जागली अंतरवाली.. ! आता मनोज जरांगे यांकडून मोठा...

जरांगे पाणी पिले, रात्रभर जागली अंतरवाली.. ! आता मनोज जरांगे यांकडून मोठा इशारा

spot_img

जालना / नगर सहयाद्री : आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. त्यांचा उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. काल त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरु होता. त्यांची प्रकृती आता खालावलेली आहे. त्यांनी पाणी पिण्यास उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीस नकार दिला होता. डॉक्टरांनी त्यांना सलाईन घेण्याची विनंती केली होती.

अखेर त्यांनी ती विनंती मान्य करत सलाईन घेतले. मात्र, मध्यरात्री त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेल्याने मराठा समाज बांधव, पत्रकार व डॉक्टरांनी केलेल्या विनंतीनंतर त्यांनी पाणी प्यायले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे अधिकच आक्रमक झाले असून आता मागे हटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून प्रकृती खालावली आहे.

त्यांच्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये समर्थकांनी रात्रभर जागून त्यांना साथ दिली. यावेळी, डॉक्टर व स्थानिक पत्रकारांच्या विनंतीनंतर व मराठा समाज बांधवांच्या आग्रहाखातर अखेर त्यांनी पाणी प्यायले. मात्र, त्यांचे उपोषण अद्यापही सुरूच आहे. दुसरीकडे सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशन घेण्याची तयारी दर्शवली आहे.

काय म्हणाले जरांगे ?
माझा जीव गेल्यावर महाराष्ट्रात सरकार राहील का ? महाराष्ट्रात दुसरी श्रीलंका दिसेल, असा इशारा देत सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे-पाटील यांनी घेतली आहे. अध्यादेशाची अंमलबजावणी करणे सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकमेकांवर ढकलत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही देणे-घेणे नाही. ते भुजबळांना बळ देतायत. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेणार नाही. माझा जीव गेल्यावर सरकार महाराष्ट्रात राहील का? आमदार, खासदार, मंत्र्यांच्या घरी लोकं जातील. पंतप्रधानांची एकही सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगरमध्ये खळबळ! मतपेट्या आणलेल्या बसमध्ये सापडले नोटांचे बंडल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील कोपरगाव येथील हि घटना असून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एसटी...

उमेदवारांची धाकधूक वाढली! नगरमध्ये कुणाच्या अंगावर पडणार गुलाल…

विधानसभेच्या परिक्षेचा शनिवारी निकाल | समर्थकांकडून गुलालाची तयारी | चौकाचौकात दावे प्रतिदावे अहिल्यानगर | नगर...

भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात; संगमनेरमध्ये झळकले फ्लेक्स

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून आता वेध लागलेत ते निकालाचे....

शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला; कुठे घडली घटना

छत्रपती संभाजीनगर । नगर सहयाद्री:- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथील एका 31 वषय महिलेवर...