spot_img
अहमदनगरमराठा आरक्षणाबाबत अधिवेशन ! आ. तनपुरे म्हणतात एक दिवस नव्हे तीन दिवसांचे...

मराठा आरक्षणाबाबत अधिवेशन ! आ. तनपुरे म्हणतात एक दिवस नव्हे तीन दिवसांचे अधिवेशन घ्या, उगाच नौटंकी नको..

spot_img

राहुरी / नगर सह्याद्री : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत 20 फेब्रुवारीला विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. परंतु आता विशेष अधिवेशनाच्या कालावधीवरून ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकार या विषयावर खरचं गंभीर आहे का? असा सवाल करत त्यांनी टीकास्त्र सोडले आहे.

‘मनापासून अधिवेशन घ्यायची सरकारची इच्छा असेल, तर किमान तीन दिवस तरी अधिवेशन घ्यावे. उगाच नौटंकी नको. या महत्त्वपूर्ण विषयावर सखोल व साधकबाधक चर्चा होणे आवश्यक आहे’, असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सरकारच्या विशेष अधिवेशनाबाबत ट्विटरवरून आपले मत व्यक्त करत सरकारला सुनावले.

’20 तारखेला मराठा आरक्षण प्रश्नावर एक दिवसाचे अधिवेशन बोलवण्यात येत आहे. एका दिवसात किती आमदार आपलं मत व्यक्त करू शकणार आहेत? पुढच्या रांगेत बसणारे सात ते आठ लोकं निम्मा दिवस घेणार. बाकीच्यांना अध्यक्ष दोन मिनिटात बेल मारणार.’ असे आपल्या ट्विटमध्ये म्हणत मराठा आरक्षणा प्रश्नी आमदारांना आपले मत व्यक्त करण्यासाठी वेळच मिळणार नाही, अशी भीती देखील तनपूरे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान मराठा आरक्षणासाठी सगेसोयरे संबंधित राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेची कायद्यात अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कान्हूरपठारकरांनी गावासह शाळाही ठेवली बंद

शेकडो पालकांसह ग्रामस्थांचा आक्रोश | ‌‘रयत‌’ च्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती | विद्याथनींमध्ये घबराटीचे वातावरण ‌‘रयत‌’ची...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, लाखो महिला अपात्र, पहा कारण

मुंबई / नगर सह्याद्री : लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे...

पैसे वसुलीस नेमलेल्यांनीच परदेशींचा काढला काटा!

10 कोंटींची खंडणी मिळत नसल्याने आवळला गळा | मृतदेह नालीत फेकला अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर...

उन्हापासून दिलासा मिळणार, पाऊस हजेरी लावणार! जिल्ह्यात कसं असेल आजचं हवामान..

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा तडाखा कायम असतानाच काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे....