spot_img
ब्रेकिंगअवैध धंद्याच भाडं फुटलं! कोपरगावात पकडला 'इतक्या' लाखांचा माल

अवैध धंद्याच भाडं फुटलं! कोपरगावात पकडला ‘इतक्या’ लाखांचा माल

spot_img

कोपरगाव । नगर सहयाद्री
स्थानिक गुन्हे अन्वेषण नगर शाखेच्या पथकाने पुणतांबा चौफुली नजीक विमल पान मसाला, सुगंधित मसाला, जाफरानी जरदा असा १६ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी मध्यप्रदेश येथील राजु उमराव भौल, मितेश राजु भाबड, अभय गुप्ता यांच्यासह योगेश कटाळे, कोपरगाव, किरण लामखडे, संगमनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पुणतांबा फाटा येथे अवैध प्रतिबंधित असा विविध कंपन्यांचा गुटखा, सुगंधी पान मसाला, सुगंधित तंबाखू याची बेकायदेशीरित्या वाहतूक सुरू असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाला मिळाली होती.

त्यानुसार संबंधित पोलिस पथकाने बुधवारी २४ एप्रिल रोजी धडक कारवाई करत जवळपास १६ लार्खाचा मुद्देमाल हस्तगत करत पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या धडक कारवाईने शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...