spot_img
अहमदनगरनगर शहरात ८७ हजारांचा गांजा जप्त! 'असा' लावला सापळा

नगर शहरात ८७ हजारांचा गांजा जप्त! ‘असा’ लावला सापळा

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
राहत्या घरी गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरून अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून आरोपीकडूृन ८६ हजार ६५० रुपये किमतीचा गांजा जप्त केला व त्यास जेरबंदही केले. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या खिस्त गल्ली येथे हा छापा टाकण्यात आला.

लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिला होता. त्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, अंमलदार संदीप पवार, संतोष खैरे, रवींद्र घुंगासे, जालिंदर माने, विशाल तनपुरे व भाग्यश्री भिटे यांचे पथक नेमले. जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.

हे पथक नगर शहर हद्दीत अवैध धंद्दे करणार्‍या इसमांची माहिती काढत असताना गेल्या २५ एप्रिल रोजी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना मतीन बशीर शेख (रा. जुना बाजार, खिस्तगल्ली, नगर) हा जवळ गांजा बाळगून त्याची राहत्या घरी बसूनच विक्री करतो अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर कोतवालीच्या पथकाने छापा टाकला. विचारपूस केली असता त्याचे नाव मतीन बशीर शेख (वय-४५, रा. जुना बाजार, खिस्तगल्ली, अहमदनगर) असे असल्याचे आढळून आले.

त्याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता कॉटच्या खाली एका शेंदर्‍या, पांढर्‍या व सिल्व्हर रंगाच्या गोणीमधून उग्र वास येत असल्याचे आढळून आले. त्या गोणीत ओलसर पदार्थ बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला आढळून आला. गांजा असल्याचे आरोपीने कबूल केले. पथकाने बशीर शेख याच्या घरातून गोणीत ठेवलेला ८६ हजार ६५० रुपये किमतीचा ०८ किलो ६६० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला.

आरोपी मतीन शेख यास जेरबंद करून त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अपर, नगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....