spot_img
अहमदनगरवीज पडून मायलेकरांचा मृत्यू: मंत्री विखे पाटील यांनी घेतली कुटुंबाची भेट

वीज पडून मायलेकरांचा मृत्यू: मंत्री विखे पाटील यांनी घेतली कुटुंबाची भेट

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री-
तालुक्यातील येवती येथे सोमवार दि.२२ रोजी गावामध्ये शेतकरी कुटुंबातील नवनाथ बाजीराव आढाव (वय, २६ वर्षे ) व मीनाबाई बाजीराव आढाव (वय, ५० वर्षे ) हे दोघे पावसाचे वातावरण झाले म्हणून शेतामध्ये कांदे झाकण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता.

ही बातमी वार्‍यासारखी संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरली तसेच या घटनेची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दि. २३ एप्रिल रोजी नैसर्गिक दुर्घटनेबाबत आढाव कुटुंबाची घरी जाऊन सांत्वन भेट घेतली.

यावेळी सरपंच नागेश मस्के, सरपंच विश्वास गुंजाळ, रवींद्र शिंदे, उमेश घेगडे, अनिल बनकर, बाळासाहेब महाडिक, ज्ञानेश्वर विखे पाटील, कोंडीबा ढवळे, अप्पासाहेब सातव, गणेश शिंदे, श्रीकांत जाधव, राहुल आढाव, पप्पू मस्के, जालिंदर चोरमले, ताराचंद रोटकर तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

घडलेली घटना मनाला वेदना देणारी
घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी व मनाला वेदना देणारी आहे. निसर्गाच्या पुढे कोणाचे काही चालत नाही परंतु या कुटुंबाला शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच अपघात विमा मध्ये या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत भेटेल यासाठी प्रयत्न करणार आहे.
– महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपात्र; कारण आलं समोर..

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडकी...

स्व. वसंतराव झावरे यांची स्वप्ने पूर्ण करणार; कोण काय म्हणाले पहा…

आ. काशीनाथ दाते | वासुंदे येथे स्व. आ. वसंतराव झावरे पाटील यांच्या पुण्यस्मरणनिमित्त कार्यक्रम पारनेर...

‘त्यांना’ दिल्लीच्या जनतेने जागा दाखविली; मंत्री विखे पाटील

लोणी | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभेत मिळविलेला एैतिहासिक विजय विचारांचा आणि विकासाचा...

…म्हणुन दोन गटांत राडा; ‘असा’ घडला नको तोच प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शेतजमिनीच्या वादातून दोन गटांत मारहाण झाल्याची घटना शिंगवे नाईक शिवारात बुधवारी...