सुजित झावरे पाटील। पुणेवाडी येथे रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन
पारनेर । नगर सहयाद्री
माझे एकच मत आहे की, तुमच्या अंतः करणात परमेश्वर पाहिजे. लोकांना देवाच्या नावाखाली कुठेतरी घेऊन जायचं, त्यांच्याकडून मतांची अपेक्षा करायची हा व्यापार करण्याचे काम मी माझ्या आयुष्यात कधी केलं नाही. मला यश मिळो अथवा न मिळो असे चुकीचं काम माझ्या हातातून होणार नाही हे मी तुम्हाला निक्षून सांगतो. असे म्हणत कोणाचेही नाव न घेता सुजित झावरे पाटील यांनी टीका केली.
सुजित झावरे यांच्या माध्यमातून मंजुर करण्यात आलेल्या तीन रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा शुभारंभ गुरूवार दि. २६ रोजी करण्यात आला. यावेळी सुजित झावरे पाटील उपस्थितांशी संवाद साधला. झावरे म्हणाले, गेल्या पाच, दहा वर्षांत तालुक्यात पाणी अडविण्याचे कोणते मोठे काम झाले हे दाखवून द्या. झाले असेल तर मी माझे भाषण थांबवून खाली बसू शकतो. परंतू एकही काम झाले नाही हे सत्य आहे. सत्ता असल्यावर कोणीही काम करते. निवडूण आल्यावर त्याला सत्तेत जाण्याची संधी मिळते. परंतू ज्याच्याकडे कोणतीही सत्ता नाही, ज्याला लोकांनी नाकारले आहे, तरीही तो म्हणत असेल की मला लोकांची सेवा करायची याला खरा नेता म्हणावं लागेल असे झावरे यांनी सांगितले.
यावेळी लोणी मावळयाचे सरपंच विलास शेंडकर, शहाजी कवडे, दत्तोबा ठाणगे, सावळेराम ठाणगे, सतिश पिंपरकर, संदीप औटी, मा. सरपंच बाळासाहेब रेपाळे, रविंद्र महाराज रेपाळे, रविंद्र पुजारी, बन्सी रेपाळे, भास्कर पोटे, गोरख पोटे, सोपान दुस्मान, बापू पुजारी, सिताराम पुजारी, जयश्री दुस्मान, बाबाजी रेपाळे, अनिल दुस्मान, नारायण रेपाळे, संदीप मगर, ज्ञानदेव रेपाळे, पांडूरंग औटी, आनंदा बोरूडे, देवराम पोटे, विनायक दुस्मान, बबन रेपाळे, संतोष रेपाळे, गंगाराम रेपाळे, बबलू रेपाळे, सचिन पोटे, नारायण रेपाळे, ज्ञानदेव बोरूडे तसेच बांगडा वस्ती, दुस्मान वस्ती परीसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावच्या विकासासाठी कटिबद्ध
सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून पुणेवाडी येथे कोट्यावधी रुपयाची विकास कामे झाली आहेत. स्व. वसंतदादा झावरे पाटील यांचेही गाववर विशेष प्रेम होते. यापुढील काळात काम करत असताना झावरे यांच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.
– बाळासाहेब रेपाळे (माजी सरपंच पुणेवाडी)