spot_img
ब्रेकिंगPolitics News: विधानसभेचे बिगुल वाजणार! आचारसंहिता कधी लागणार? मोठी माहिती आली समोर..

Politics News: विधानसभेचे बिगुल वाजणार! आचारसंहिता कधी लागणार? मोठी माहिती आली समोर..

spot_img

Politics News: विधानसभेचे बिगुल लवकरच वाजणार असून सर्वच पक्षानी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महायुतीमध्ये जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे तर महाविकास आघाडीने आपली रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. अशातच एक मोठीये अपडेट समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आय़ुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वात १४ जणांचे पथक दाखल झाले असून महाराष्ट्रात १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान मतदान आणि २० नोव्हेंबरपर्यंत निकाल असा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज २७ सप्टेंबरला सकाळी १० वाजता सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक होणार आहे. तर २८ सप्टेंबर रोजी शनिवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व जिल्ह्यातील पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक यांच्यासोबत बैठक आयोजिक करण्यात आली आहे. त्यानंतर शनिवारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. शनिवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान सर्वत्र विधानसभा निवडणूक कधी होणार? आचारसंहिता कधी लागणार? याबाबत उलट सुलट चर्चा ऐकण्यास मिळत आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी राज्यात दोन टप्प्यात निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला होता. काही तज्ज्ञांच्या मते राज्यात विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होतील.२८८ विधानसभा मतदारसंघातील निवडणुका दोन टप्प्यात घेण्याचं ठरवल्यास १३ नोव्हेंबर आणि १६ नोव्हेंबर या दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. तर २० नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या निकाल लागू शकतो. एकाच टप्प्यात निवडणुका घ्यावयाचे ठरल्यास १६ नोव्हेंबर रोजी मतदान होऊ शकते. तर २० नोव्हेंबर रोजी निकाल लागू शकतो अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...