spot_img
अहमदनगर‘एकविराच्या स्पर्धेत शेकडो महिलांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद’

‘एकविराच्या स्पर्धेत शेकडो महिलांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद’

spot_img

संगमनेर | नगर सह्याद्री
कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या महिला टेनिस बॉल व रस्सीखेच स्पर्धेमध्ये संगमनेर तालुका व शहरातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला असून ग्रामीण भागातील महिलांनी गाड्या भरून येत क्रिकेट पाहण्याचा व खेळाचा आनंद लुटल्याने दैनंदिन कामाच्या व्याप्तीतून महिला आनंदाने क्रिकेटमध्ये रमल्या असून मनमोकळ्या गप्पा आणि हास्यविनोदात एकवटल्या आहेत.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशनच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या महिला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा व रस्सीखेच स्पर्धेत आज तिसर्‍या दिवशी २२० महिलांनी क्रिकेट खेळले. तरी ११० महिलांनी रस्सीखेच स्पर्धेत सहभाग घेतला.

यावेळी कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री  थोरात आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. तिसर्‍या दिवशी सुरू असलेल्या या स्पर्धेत ग्रामीण भागातील महिलांच्या क्रिकेट सामन्याने रंगत आली अनेक गावांमधून टेम्पो व जीपमधून महिला स्टेडियम मध्ये आल्या.

यानंतर स्पोर्ट किट व डोक्यावर कॅप घालून महिलांनी क्रिकेट खेळण्याचा व पाहण्याचा मनमुराद आनंद लुटला.इतर वेळी कायम घरगुती काम आणि शेतीच्या कामात व्यस्त असणार्‍या महिलांनी नऊवार साडी ऐवजी परिधान केलेले स्पोर्ट किट ,डोक्यावर घातलेली कॅप, आणि एकमेकांना खेळण्यासाठी प्रोत्साहित केलेले वातावरण यामुळे संपूर्ण स्टेडियम आनंदाने भारावून गेले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...