spot_img
अहमदनगरलंके साहेब, तुमच्या खांद्यावर बंदूक...! पक्ष प्रवेशाच्या चर्चानंतर अजित पवार गटाकडून भावनिक...

लंके साहेब, तुमच्या खांद्यावर बंदूक…! पक्ष प्रवेशाच्या चर्चानंतर अजित पवार गटाकडून भावनिक आवाहन, व्हायरल ट्विट मध्ये नेमकं काय?

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
अहमदनगरमधील पारनेर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सकाळपासून वाऱ्यासारखी पसरली आहे. निलेश लंके यांच्या निर्णयानंतर अजित पवार गटाकडून त्यांना परत यावं अशी साद घालण्यात येत आहे. लंके साहेब, तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली जातेय, दादांची साथ सोडू नका असं ट्विट करत आमदार अमोल मिटकरी यांनी आवाहन केलंय.

सध्या आ. निलेश लंके हे खासदारकी लढवण्यास इच्छुक आहेत, पक्ष फुटीच्यावेळी लंके अजितदादांसोबत गेले. तर नगरची जागा भाजपच्या वाट्याला आहे. येथे बदल होण्याची शक्यता धूसर असल्याने लंके पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आमदार निलेश लंके यांनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केलं आहे. लंकेंनी घेतलेला हा निर्णय अजित पवार गटाला चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. त्यामुळे भावनिक आवाहन करत अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे.

नेमकं ट्विटमध्ये काय?

लंके साहेब तुमच्या खांद्यावर बंदुक ठेवली जातेय. दादांची साथ सोडू नका. तुम्हाला इतरांपेक्षा उज्वल राजकीय भविष्य आहे . तुतारी गटाला लोकसभा लढवायची एवढीच हौस असेल तर बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाला मैदानात उतरवून बघा म्हणावं. तुम्ही एक सामान्य आहात म्हणुन विनंती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...