spot_img
तंत्रज्ञानHonor : लॉन्च होतायेत 'हे' दोन जबरदस्त Smartphone ! जाणून घ्या फीचर्स

Honor : लॉन्च होतायेत ‘हे’ दोन जबरदस्त Smartphone ! जाणून घ्या फीचर्स

spot_img

नगर सह्याद्री टीम : येत्या 23 नोव्हेंबर रोजी Honor 100 आणि Honor 100 Pro हे दोन नवीन स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च होतायेत. हे दोन्ही स्मार्टफोन उत्कृष्ट असून त्यांचे फीचर्स, स्पेसिफिकेशन,किंमत आदींविषयी सविस्तर माहिती आपण येथे पाहुयात –

फिचर्स
या फोन संदर्भात लीक झालेल्या माहितीनुसार Honor 100 आणि Honor 100 Pro या दोन्हीमध्ये उत्कृष्ट डिस्प्ले असेल. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा क्वाड-वक्र OLED पॅनेल असणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा पॅनल 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. कॅमेऱ्याच्या बाबतीत विचार केला तर फ्रंट कॅमेरा 50MP असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी हे उत्कृष्ट ठरेल. प्रो व्हेरियंटमध्ये देखील 50MP प्राथमिक सेल्फी कॅमेरा आणि 32MP अल्ट्रा-वाइड सेल्फी कॅमेरा असेल अशी असा अंदाज आहे.

इतर फीचर्स
Honor 100 आणि Honor 100 Pro या दोन्हींमध्ये Android 14 वर आधारित Magic OS UI असेल. बॅटरी देखील 5,450mAh अशी उत्तम दर्जाची असेल. ही बॅटरी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. याव्यतिरिक्त, दोन्ही फोनमध्ये प्लास्टिक फ्रेम, ड्युअल स्पीकर, NFC, एक IR ब्लास्टर आणि X-axis लिनियर मोटर यासारखी इतर फीचर्स असतील.

किमतीबाबत जाणून घेऊयात –

Honor 100 ची किंमत :
12GB+256GB: 32,497 रुपये
16GB+256GB: 35,996 रुपये
16GB+512GB: 39,412 रुपये

Honor 100 Pro ची किंमत :
12GB+256GB: 42,911 रुपये
16GB+256GB: 46,411 रुपये
16GB+512GB: 49,911 रुपये

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाऊस आला रे आला; कुठे दाखल झाला पाऊस, महाराष्ट्रात केव्हा येणार पहा…

पुणे / नगर सह्याद्री : आत्ता पावसाबाबत महत्वाची अपडेट समोर येत असून मान्सून अंदमानात...

Health Tips: उत्तम आरोग्यसाठी ‘या’ भाज्या लाभदायक तर ‘त्या’ हानिकारक!

नगर सहयाद्री टीम- उत्तम आरोग्य हाच खरा 'दागिना' आहे. उत्तम आरोगयासाठी सर्वत्तम आहाराची गरज असते....

आजचे राशी भविष्य! वाचा कसा जाईल तुमचा आजचा दिवस..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले...

Ahmednagar: सावधान! प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती बनवताय? ही बातमी एकदा वाचा..

अहमदनगर | नगर सह्याद्री प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार न करता पर्यावरण पूरक मूर्ती...