spot_img
अहमदनगरAhmednagar : अभिनेता मकरंद अनासपुरेंनी घेतले जातेगाव येथील भैरवनाथांचे दर्शन

Ahmednagar : अभिनेता मकरंद अनासपुरेंनी घेतले जातेगाव येथील भैरवनाथांचे दर्शन

spot_img

सुपा / नगर सह्याद्री : मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी श्री काळभैरवनाथ देवस्थान, जातेगाव या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी विजय गायकवाड यांनी देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार केला.

यावेळी त्यांना देवस्थानची माहिती देताना सांगितले की, देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध विकास कामे पूर्ण झाली असून काही विकास कामे सुरू आहेत. यंदा पावसाने ओढ दिली असून पाऊस मुबलक प्रमाणात झाल्यास मंदिर परिसरात धबधबे खळखळून वाहतात.

यादरम्यान पर्यटकांची मोठी गर्दी असते. देवस्थान ट्रस्ट व परिसरातील भाविकांच्या वतीने दर रविवारी महाआरती नंतर प्रसादाचे आयोजन करण्यात येते आदी माहिती त्यांना देण्यात आली.

यावेळी सत्काराला उत्तर देताना मकरंद अनासपुरे यांनी देवस्थानच्या विकास कामाबद्दल कौतुक केले.  निसर्गाच्या कुशीत असलेल्या देवस्थान परिसरात मला एक चित्रपट शूटिंग करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

लवकरच आपण यावर एक मीटिंग घेऊन त्याचे नियोजन करू असे आश्वासन दिले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनीता पोटघन, देवस्थानचे सचिव सचिन ढोरमले, गावातील युवा नेते सोमनाथ ढोरमले, संदीप ढोरमले, राजेंद्र भोगाडे, भाऊसाहेब पोटघन, मारुती पोटघन, बाळू शेलार आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...