spot_img
महाराष्ट्रमराठा-ओबीसी वाद; छगन भुजबळांंमागे अदृश्य हात?, 'या' पवारांचे मोठे विधान

मराठा-ओबीसी वाद; छगन भुजबळांंमागे अदृश्य हात?, ‘या’ पवारांचे मोठे विधान

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री – राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेली संघर्ष यात्रा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. रोहित पवार यांच्या या यात्रेला नागरिकांचा, तरुणांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. ही संघर्ष यात्रा सध्या बीड जिल्ह्यात आहे. या दरम्यान, मराठा-ओबीसी वाद मिटवण्यापेक्षा जबाबदार मंत्री छगन भुजबळ हे भाषणे देत आहेत. भुजबळांमागे अदृश्य हात असू शकतो, असे मोठे विधानही आ. रोहित पवार यांनी केले आहे.

अगोदर ३ तालुयात दुष्काळ जाहीर केला अन त्यानंतर शेतकर्‍यांनी आक्रोश केल्यानंतर सर्व तालुयात दुष्काळ जाहीर केले. सुरुवातीला दुष्काळ जाहीर केलेल्या तालुयातील मदत आणि नंतर दुष्काळ जाहीर केलेल्या ८ तालुयातील मदत यामध्ये तफावत आहे. आता शेतकर्‍यांना मुलाच्या फीची चिंता आहे. असे रोहित पवार यावेळी म्हणाले.
युवांच्या नोकरीच्या प्रश्नासाठी ही यात्रा काढली आहे. मुद्द्याचं बोला अस आम्ही नेत्यांना बोलत आहोत. जर या शेतकर्‍यांना मदत दिली नाही तर मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढू शकतील.. अशी चिंताही आमदार रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी सध्या आरक्षणावरुन सुरू असलेल्या मराठा ओबीसी वादावर मोठे विधान केले. मराठा ओबीसी वाद हा लोकांमध्ये नाही, हा वाद नेत्यांमधून घडवला जातोय.. असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे ओबीसी नेते होण्याचा प्रयत्न करतायेत.. असेही ते यावेळी म्हणाले.

तसेच हा वाद मिटवण्यापेक्षा जबाबदार मंत्री छगन भुजबळ हे भाषणे देत आहेत. सर्व नेत्यांनी दिल्लीत बसून हा वाद मिटवावा. असे म्हणत भुजबळांमागे अदृश्य हात असू शकतो, असे मोठे विधानही रोहित पवार यांनी यावेळी केले आहे. बीड शहरामध्ये जे काही झालं त्यामध्ये सरकारमधील एका व्यक्तीचा हात होता. असा आरोपही त्यांनी केला आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘महसूलमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातुन तीन कोटी निधी’

सागर मैड यांची पत्रकार परिषदेत माहिती सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील सुपा गावात येत्या काळात...

…म्हणून प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना महत्व, जाणून घ्या सविस्तर

नगर सहयाद्री टीम- प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना फार महत्व दिले जात होते. बाजारात चककणारी व...

‘गोड’ साखरेचा हंगामा ‘कडवट’, साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या बांधावर

नगर सह्याद्री टीम- यंदा पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थितीत उसाचे उत्पादन घटल्याचे दिसून येत आहे. सुरू झालेल्या...

Rain Updates: चिंता वाढली! ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ धडकणार,’या’ जिल्ह्यात पुन्हा मुसळधार

मुंबई। नगर सहयाद्री- बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यान चक्रीवादळ तयार होत असून मध्यप्रदेश...