spot_img
अहमदनगरहृदयद्रावक! दोन सख्या चिमुकल्या भावांचा मृत्यू; नगरच्या 'या' शिवारात काळीज पिळवटून टाकणारी...

हृदयद्रावक! दोन सख्या चिमुकल्या भावांचा मृत्यू; नगरच्या ‘या’ शिवारात काळीज पिळवटून टाकणारी घटना

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
चास (ता. अहिल्यानगर) शिवारात घराजवळ साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या डबक्यात पडल्याने दोन बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 27 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. अमितेश बलराज बिडे (वय 10) व अनिकेत बलराज बिडे (वय 06, दोघे रा. चास, ता. अहिल्यानगर)) असे मयत बालकांची नावे आहेत. ते दोघे सख्खे भाऊ आहेत.

याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या अमितेश व अनिकेत हे दोघे सख्खे भाऊ त्यांच्या घराजवळ पावसाच्या पाण्यामुळे साचलेल्या डबक्यात पडले. त्याच्या नातेवाईकांना ही घटना कळताच त्यांनी त्या दोघांना बाहेर काढले.

ते बेशुध्द झाल्याने त्यांचे चुलते जयसिंग बिडे यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना उपचारापुर्वीच मयत घोषित केले. तशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे चास शिवारात शोककळा पसरली. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...