spot_img
अहमदनगरदोघे एकमेकांच्या विरोधात लढले पण विकासासाठी एकत्र आले! नगर जिल्ह्यातील दोन 'बड्या'...

दोघे एकमेकांच्या विरोधात लढले पण विकासासाठी एकत्र आले! नगर जिल्ह्यातील दोन ‘बड्या’ नेत्यांचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

spot_img

 Ahilyanagar Politics News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी आमदार राहुल जगताप, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजेंद्र नागवडे या दोन साखर कारखानदारांसह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी आज, बुधवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. तसेच श्रीगोंदा तालुक्यात नव्या राजकारणाची नांदी होणार आहे.

माजी आमदार राहुल जगताप हे सहकारमहर्षी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. तर राजेंद्र नागवडे हे सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. जगताप गेले काही दिवसांपासून शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे संकेत मिळत होते. राजेंद्र नागवडे यांनी काँग्रेस, भाजप असा प्रवास करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. आता पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीत उडी घेतली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे म्हणाले, सहकारातील दोन मातब्बर नेते राजेंद्र नागवडे व राहुल जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावरील विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तालुक्याला विकासाची वेगळी ताकद देण्यात येईल.

दोघे एकमेकांच्या विरोधात लढले असले तरी अजित पवार यांच्या नेतृत्वात श्रीगोंदे तालुक्याच्या विकासासाठी ते एकत्र आले आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुढील महिन्यात श्रीगोंद्यात मेळावा घेण्यात येईल.यावेळी आमदार शिवाजीराव गर्जे, आनंद परांजपे, संजय तटकरे, सुरज चव्हाण, अशोक सावंत, भगवानराव पाचपुते आदींसह श्रीगोंद्यातील जगताप व नागवडे समर्थक उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...