spot_img
ब्रेकिंगगुलालच!! सर्व मागण्या मान्य? मराठा समाजाचा आनंदोत्सव, जरांगे पाटील म्हणाले, अत्ता..?

गुलालच!! सर्व मागण्या मान्य? मराठा समाजाचा आनंदोत्सव, जरांगे पाटील म्हणाले, अत्ता..?

spot_img

नवी मुंबई। नगर सहयाद्री
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पित आपले उपोषण मागे घेतले आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची कुणबी नोंदी आणि सगेसोयरे या बाबतची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. राज्य सरकारने सगेसोयरे म्हणून कुणाला लाभ देता येईल या संदर्भातील राजपत्र प्रकाशित केले आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारने ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या सगेसोयर्‍यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावीत, अशी मागणी केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर शिंदे यांनी जरांगे यांना ज्यूस दिल्यानंतर जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतल्याची अधिकृत घोषणा केली. यावेळी भाजपकडून गिरीश महाजन उपस्थित होते.

जालन्यातील आंतरवाली सराटी येथून २० जानेवारीपासून मोर्चा काढला होता. मनोज जरांगे यांचा मोर्चा नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होताच राज्य सरकारने त्यांची मागणी मान्य केली. राज्य सरकारने यासंदर्भात एक राजपत्र प्रकाशित केले आहे. राजपत्रातून जारी केलेला मसुदा १६ फेब्रुवारी २०२४ पासून विचारात घेण्यात येईल असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपस्थित मराठा समाजाला संबोधित केले. कुणबी नोंदींच्या आधारे सगेसोयर्‍यांना जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील राजपत्र मुख्यंमत्र्यांनी जरांगे यांच्याकडे दिले. यावेळी जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे विविध मागण्या केल्या. न्या. शिंदे समितीला देखील मुदतवाढ द्यावी, अशी मागणी जरांगे यांनी केली.

जरांगे म्हणाले, मराठा समाजाच्या ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या. त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या त्यांच्या सगेसोयर्‍यांना जातप्रमाणपत्र मिळावे. माझ्या मराठ्यांनी आरक्षणासाठी संघर्ष केला. ३०० पेक्षा अधिक मुलांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहे. मराठा आरक्षणासाठी अनेक घरांतील कर्ता पुरुष गेलेला आहे. ज्यांची नोंद मिळाली त्यांची गृहचौकशी न करता जात प्रमाणपत्र वाटप करावीत. आंतरवाली सराटीतील गुन्हे मागे घेतले जावेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाने उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नये. हैदराबादचे १८८४ चे गॅझेट लागू करावे.

मराठ्यांना दिलेली शपथ पूर्ण केली ः मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे
मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांची वाशी येथे भेट घेतली. ज्यूस दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा शब्द देतानाच मी मराठ्यांना दिलेली शपथ पूर्ण केली, असा दावाही केला.

अध्यादेश टिकविण्याची जबाबदारी सरकारची
ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्राबाबतचा अध्यादेश सरकारकडून काढला आहे. तसेच सगेसोयर्‍यांनाही प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याबाद्दल जरांगे यांनी सरकारचे आभार मानले. आभार मानतानाच ‘मराठा आरक्षणाचा जो अध्यादेश काढण्यात आला, तो अध्यादेश टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे’ याची आठवणही जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली.

आरक्षणाच्या अध्यादेशानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. जरांगे यांच्या मोर्चाविरूद्ध अ‍ॅड. सदावर्ते न्यायालयात गेले होते. मध्यंतरी जरांगे-सदावर्ते यांच्यात आरोप-प्रत्यारोपही वाढले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने ही काळजी घेतली आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर वकील सदावर्ते यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...