spot_img
ब्रेकिंगParner: 'पाॅलिहाऊससाठी शासन भरणार 'एवढी' रक्कम तर दुध भेसळी विरोधात 'नविन' निर्णय'

Parner: ‘पाॅलिहाऊससाठी शासन भरणार ‘एवढी’ रक्कम तर दुध भेसळी विरोधात ‘नविन’ निर्णय’

spot_img

पालकमंत्री विखे पाटील व अण्णा हजारे यांच्यात काय झाला संवाद?

पारनेर । नगर सहयाद्री

पॉली हाऊस साठी विमा घेणे शेतक-यांना परवडत नव्हते म्हणून आम्ही अता पॉली हाऊस च्या विमा रकमेपैकी ७५ टक्के रक्कम सरकार भरणार आहे असा निर्णय घेतल्याचेही महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजारे यांना सांगीतले.

या वेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ, मुख्यकार्यकारी अधिकारी अशीष येरेकर उपस्थीत होते.तर दुसरीकडे दुध दरासंदर्भात राज्यात सुमारे ३० टक्के भेसळीचे दुध आहे. मात्र दुध भेसळी विरोधात खाजगी दुध प्रक्रिया उद्योजकांवर कारवाई केली तर ते दुध खरेदी करणार नाहीत मग दूध कोणाला घालणार अशी प्रतिक्रीया पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी संवाद साधताना दिली.

नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले काही दिवसांपुर्वी श्रीगोंदे येथे दुध भेसळ विरोधात कारवाई केली तर एकाच दिवसात ६० हजार लिटर दुध कमी झाले होते. मात्र कडक कारवाई करण्यात आडचणी येत आहेत. त्यांच्यावर कारवाई केली व खाजगी दुध प्रक्रीया करणा-या उद्योजकांनी दुध घेतले नाही तर दुध कोठे घालणार असा प्रश्न निर्माण होईल.

मात्र आता आम्ही कालच एक नविन निर्णय घेतला आहे त्यामुळे दुधातील भेसळ कमी होण्यास मदत होणारा आहे. कांदा पिकास पिकविमा मिळणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले, मात्र हे पिक रब्बी हंगामात येत नसल्याने विमा मिळणार नाही असेही अधिका-यांनी सांगीतले. मी कृषी मंत्री असताना हवामानावर अधारीत पिक विमा योजना आणली असेही ते म्हणाले.

मी माझ्या ८८ वर्षाच्या काळात असा गारांचा पाऊस पाहिला नव्हता मात्र यात कोणतीही मनुष्य हानी झाली नाही हे सुदैव आहे.मी कालच जिल्हाधिकारी यांना फोनवरून गारपिटीची माहीती दिली होती. सरकारी अधिका-यांनी तातडीने नुकसानिचे पंचनामे करावेत व सरकारने तातडीने शेतक-यांना मदत द्यावी. तसेच जनावरांच्या चा-याची सोय करावी

-अण्णा हजारे जेष्ठ समाज सेवक

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या जातकांना मिळणार गोड बातमी

मुंबई नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे...

अभिनेत्री नयनतारा झाली सायबर क्राईमची शिकार; पहा नेमक काय घडलं…

नगर सह्याद्री वेब टीम - नयनतारा ही साऊथची सुपरस्टार आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत...

‘पोलिस मुख्यालयातील बाप्पाचे विसर्जन’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर पोलिसांकडून आजच बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. गेल्या आठ...

बापरे! महापालिकेत ६० कोटींचा भ्रष्टाचार? ‘कोणी आणि का केली मागणी?

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक योगिराज शशिकांत गाडे यांनी शहरात सुरू असलेल्या...