spot_img
अहमदनगरAhmednagar : नगरकरांनो करामध्ये 75 टक्के शास्ती माफी होणार? आ. संग्राम जगताप...

Ahmednagar : नगरकरांनो करामध्ये 75 टक्के शास्ती माफी होणार? आ. संग्राम जगताप प्रयत्नशील, पहा..

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगर महानगरपालिकेचा कर मोठ्या प्रमाणात थकीत असून महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे शहरातील मूलभूत प्रश्नांबरोबरच विकास कामे करताना अडचणींना सामोरे जावे लागते. शहरातील करदाते शास्ती माफी भरण्यास तयार आहेत.

मात्र आयुक्त यांनी करदात्यांना शास्ती माफीचा लाभ दिला आहे. तरी आयुक्त यांनी तातडीने शहरातील सर्वच करदात्यांना 75 टक्के शास्ती माफीचा लाभ तातडीने द्यावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी निवेदनाद्वारे आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्याकडे केली आहे.

शहरातील अनेक करदात्यांनी माझ्याशी संपर्क साधला असून मनपाने फक्त 50,000 रु./- वर शास्ती माफी दिली आहे. तरी सर्वच करदात्यांना 75 टक्के शास्ती माफीचा लाभ मिळाल्यास करदाते मोठ्या प्रमाणात कर भरतील, नागरिक महानगरपालिकेचा जो मालमत्ता कर आकारते ते भरण्यास तयार आहेत. पण काही आर्थिक अडचणीमुळे अनेक करदाते कर भरु शकत नाही.

यामुळे या नागरिकांच्या मालमत्ता करामध्ये अतिरिक्त दंड (शास्ती कर) लागलेला आहे. जर ही शास्ती आपल्या अधिकारात 75 टक्के सूट दिल्यास अनेक करदाते थकबाकी भरण्यास तयार होतील, यामुळे थोड्याफार प्रमाणात महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. यातून विकास कामांसाठी निधी उपलब्ध करता येईल. तरी तातडीने शहरातील करदात्यांना 75 टक्के शास्ती माफीचा लाभ द्यावा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पिकअप-रिक्षाचा भीषण अपघात; पाच जण गंभीर जखमी…

जामखेड / नगर सह्याद्री जामखेड करमाळा रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाने पाडळी फाट्यावर असलेल्या...

Politics News: नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी भाजपानेच आखला डाव? ठाकरे गटाच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई। नगर सहयाद्री- शिनसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मोठा दावा करण्यात आला आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणावर...

‘सिंघम अगेन’ मधील अजय देवगणचा ‘फर्स्ट लूक’ समोर

नगर सहयाद्री टीम- बॉलीवुड अभिनेता अजय देवगणचं नाव घेतलं की त्याची ‘सिंघम’ व्यक्तिरेखा डोळ्यासमोर आल्याशिवाय...

सुखी संसारात पडलं विरजण! बावीस दिवसांपूर्वी झाले होते लग्न, पण क्षणात होत्याच नव्हतं झालं..

जामखेड । नगर सहयाद्री मोठ्या थाटामाटात विवाह पार पडल्यानंतर नव दाम्पत्य सुखी संसाराचे स्वप्न पाहत...