spot_img
महाराष्ट्रदंगली झाल्या तर जबाबदार कोण? अजित पवारांनी मनोज जरांगे यांचे टोचले कान…आरक्षणासंदर्भात...

दंगली झाल्या तर जबाबदार कोण? अजित पवारांनी मनोज जरांगे यांचे टोचले कान…आरक्षणासंदर्भात प्रथमच भूमिका

spot_img

कर्जत / नगर सह्याद्री : राज्यात मागील काही दिवसांपासून आरक्षणाबाबत वातावरण ढवळले आहे. एकीकडे मराठा समाजाची आरक्षणासाठी लढाई सुरु आहे. दुसरीकडे मंत्री भुजबळ हे ओबीसींच्या सभा घेत याला विरोध करत आहेत. आता अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात प्रथमच रोखठोक भूमिका त्यांनी मांडली. त्यात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे कान टोचले. कर्जत मध्ये ते बोलत होते.

अजित पवार नेमकं काय म्हणाले
जातीचा अभिमान जपला पाहिजे. पण इतर जातींबद्दल द्वेष बाळगू नका. समाजाचा प्रश्न सोडवताना इतरांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. काळाच्या ओघात एखादा समाज मागे पडला असेल तर तो तपासायला वेळ लागतो. मराठा समाजात आरक्षण देताना इम्पिरिकल डेटा महत्त्वाचा असतो.

त्याशिवाय आरक्षण टिकत नाही. हे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. त्यामुळे जातीनिहाय जनगणना व्हायला हवी असे ते म्हणाले. सध्या जाती जातीत भांडणे उभी राहिली ते महाराष्ट्राच्या हिशोबाने दुर्देवी आहे. शिवाजी महाराजांनी १८ पगडा जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले.

पण आज महाराष्ट्रात काय सुरु आहे? त्यांचा स्वप्नातील महाराष्ट्र हाच आहे का? आपली मुले शिकावी हे प्रत्येक आई-बापाचे स्वप्न असतेच परंतु इतरांचे पोर शिकू नये हि विचारधारा काही कामाची नाही. आज महाराष्ट्रात चिथावणी करणारे भाषणे होत आहे हे थांबले पाहिजे, जर महाराष्ट्रात दंगली झाल्या तर यास जबाबदार कोण असेल असा सवालही त्यांनी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या जातकांना मिळणार गोड बातमी

मुंबई नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे...

अभिनेत्री नयनतारा झाली सायबर क्राईमची शिकार; पहा नेमक काय घडलं…

नगर सह्याद्री वेब टीम - नयनतारा ही साऊथची सुपरस्टार आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत...

‘पोलिस मुख्यालयातील बाप्पाचे विसर्जन’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर पोलिसांकडून आजच बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. गेल्या आठ...

बापरे! महापालिकेत ६० कोटींचा भ्रष्टाचार? ‘कोणी आणि का केली मागणी?

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक योगिराज शशिकांत गाडे यांनी शहरात सुरू असलेल्या...