spot_img
ब्रेकिंगRain update: चार दिवस मुसळधार पावसाच्या 'धारा'! हवामान विभागाचा या' जिल्ह्यांना अलर्ट?

Rain update: चार दिवस मुसळधार पावसाच्या ‘धारा’! हवामान विभागाचा या’ जिल्ह्यांना अलर्ट?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री
रखरखत्या उन्हाने महाराष्ट्र पोळून निघाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान चाळीशीच्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झालेले असतानाच आता पुन्हा राज्यात अवकाळी पाऊस होणार आहे. राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याच्या इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, पूर्व विदर्भात काल अवकाळी पावसासह जोरदार गारपीटने अनेक भागात हजेरी लावली. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने होरपळणार्‍या विदर्भातील तापमानात घट झाली. मात्र हा अवकाळी पाऊस शेतातील पिकांसाठी नुकसानदायक ठरला आहे. काही ठिकाणी फळबागांचे नुकसानही झाले आहे.

आता पुन्हा विदर्भातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याचा आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली असून विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा तसेच मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांचा कडकडाट वादळी वार्‍यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...