spot_img
अहमदनगरAhmadnagar Politics: राजकारण तापले! आ. थोरातांच्या बालेकिल्ल्यात मंत्री विखे पाटलांचा 'गौप्यस्फोट', दिवसा...

Ahmadnagar Politics: राजकारण तापले! आ. थोरातांच्या बालेकिल्ल्यात मंत्री विखे पाटलांचा ‘गौप्यस्फोट’, दिवसा मातोश्री, सायंकाळी सिल्वर ओक आणि रात्री भाजप..

spot_img

संगमनेर | नगर सह्याद्री
अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आता नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात सध्या दिवसा मातोश्री, सायंकाळी सिल्वर ओकवर आणि रात्री भाजपच्या लोकांसोबत असतात, अशी सध्या त्यांची अवस्था आहे. थोरात भाजपात आले तर स्वागतच आहे, त्यांचे आता भाजपासोबत आतून संबंध प्रस्थापित झाले आहेत, फक्त प्रवेशाची औपचारिकता बाकी आहे, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

विखे पाटील यांनी संगमनेर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे. नगर जिल्ह्यात प्रचारसभेसाठी आलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना विखे पाटील पिता-पुत्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा करीत थोरात यांना सावध राहण्याचा सल्ला दिला होता. यावर बोलताना थोरात यांनी आपल्याही कानावर तसे आल्याचे म्हटले होते तर विखे पाटील यांनी उलट थोरात यांचाच भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला होता.

या विषयावर पत्रकारांनी विखे पाटील यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले, थोरात सध्या दिवसा मातोश्री, सायंकाळी सिल्वर ओकवर आणि रात्री भाजपच्या लोकांसोबत असतात. अशी सध्या त्यांची अवस्था आहे. त्यामुळे त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. मुळात थोरात यांची भाजपमध्ये येण्याची इच्छा होती, पण भाजपमध्ये त्यांना कोणी घेत नाहीत. ते जर भाजपमध्ये आले तर स्वागतच आहे.त्यांचे आजच भाजपासोबत आतून संबंध प्रस्थापित झाले आहेत. आता फक्त औपचारिकता बाकी आहे, असेही विखे पाटील म्हणाले.

पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे भाकित केले आहे. त्यासंबंधी विचारले असता विखे पाटील म्हणाले, पवार यांच्या लक्षात आले आहे की, त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. त्यामुळे ते हतबल झाले आहेत. त्यांच्या या विधानावर आम्ही काही बोलण्यापेक्षा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच उत्तर दिलेले चांगलेले राहील. पवार यांच्यासोबत आता किती सहकारी राहिलेत? खरी राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आहे.पवार यांनी १९९९ मध्ये काँग्रेस पक्ष सोडला त्यावेळी सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याचा मुद्दा होता.

आता एवढ्या वर्षानंतर त्यांना काय उपरती झाली की ते पुन्हा काँग्रेससोबत हात मिळवणी करीत आहेत. त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही. त्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली आहे. पवार काँग्रेसोबत येणार म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिंता करण्याची गरज नाही. पटोले पुन्हा भाजपमध्ये येऊ शकतात, अशी टिप्पणीही विखे पाटील यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....