spot_img
महाराष्ट्रआधी आजोबा आता आज्जी ! रोहित पवारांची चौकशी होईपर्यंत प्रतिभाताई पवार राष्ट्रवादीच्या...

आधी आजोबा आता आज्जी ! रोहित पवारांची चौकशी होईपर्यंत प्रतिभाताई पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात ठाण मांडणार

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री
राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांची मागील आठवड्यात ईडीची चौकशी करण्यात आली होती. आज पुन्हा त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मागील वेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे त्यांच्यासोबत होते. यावेळी त्यांच्या आजी प्रतिभाताई पवार त्यांना साथ देणार आहेत. रोहित पवार यांची ईडीची चौकशी होईपर्यंत त्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात ठाण मांडून बसणार आहेत.

रोहित पवार यांच्यावर ईडीकडून करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. अनेक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात गर्दी केली आहे. या कार्यकर्त्यांनी ईडीच्या या कारवाईविरोधात प्रदेश कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु केलं. यावेळी रोहित पवारांनी त्यांना आंदोलन न करण्याची विनंती केली.

रोहित पवार आज ईडी कार्यालयात चौकशीला जाण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात आले. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे रोहित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या आजी आणि शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या स्वत: आज राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आल्या. त्यांनी रोहित पवारांना आशीर्वाद दिला.

प्रतिभा पवार आज दिवसभर रोहित पवार यांची ईडी चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राहणार आहेत. प्रतिभा पवार यांच्यासह रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे देखील आज राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात ठाण मांडून बसणार आहेत. रोहित पवार ईडी कार्यालयात जात असताना त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कुंती पवार आणि बहीण रेवती सुळे या देखील प्रदेश कार्यालयात उपस्थित होत्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

  बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक पारनेर | नगर सह्याद्री अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने...

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...