भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील यांचा विरोधकांना टोला | लोणीमावळा रस्ता कामाचा शुभारंभ
निघोज | नगर सह्याद्री –
पारनेर तालुयात सर्वाधिक विकासकामे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली असून डाळ आणी साखर गोरगरिबांना मिळत आहे. म्हणून विरोधकांचा पोटसूळ उठला असून याचे उत्तर जनता लोकसभा निवडणुकीत देईल असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
लोणीमावळा ते देवीभोयरे तसेच लोणीमावळा ते बाभुळवाडे रस्त्याच्या कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी राहुल विखे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, आकाश वराळ, संग्राम पावडे, लहू भालेकर, माजी सरपंच भाऊसाहेब डेरे, उपसरपंच मोहन कामठे, सोसायटीचे चेअरमन स्वप्नील मावळे, माजी चेअरमन डॉ.सुभाष मावळे, संतोष शेंडकर, माजी सरपंच विलासराव शेंडकर, माजी चेअरमन कैलासराव गोरडे, युवा नेते महेश कोल्हे, माजी सरपंच वंदना मावळे, ग्रामपंचायत सदस्य नुरा पठाण, कांदा व्यापारी भाऊ लाळगे, गणेश शेंडकर, हसन पठाण, पोपट तुपे, सोसायटी संचालक बाबा कामठे, शिवाजी तुपे, पोपट लाळगे, व्हा चेअरमन प्रकाश शेंडकर, बन्सी लाळगे, भिमाजी लाळगे, चंद्रकांत शेंडकर, सागर पडवळ, पिराजी तुपे, देवराज शेंडकर, सुभाष मावळे, रामभाऊ मावळे, विठ्ठल मावळे, शशिकांत मावळे, अनिल लाळगे, दीपक मावळे, माजी सरपंच अशोक मावळे आदी उपस्थित होते.
शिंदे पाटील यावेळी म्हणाले निघोज – अळकुटी जिल्हा परिषद गटात सर्वाधिक कामे करण्याचा मान संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील यांनी मिळविला आहे. आम्ही दहा वीस लाखांचे भुमिपुजन करतो मात्र तालुयातील विकासकामांचा विचार केला तर प्रत्येक वाडी वस्तीवर विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. हाच आकडा काही कोटीत आहेत. आमची विकासकामे सातत्याने सुरू आहेत. आकडे जाहीर करायची व कामे मात्र प्रत्यक्षात चार साडेचार वर्षांनी हा आमचा विषय नाही. डाळ आणी साखर गरीबांना मिळाली म्हणून विरोधकांचा पोटसूळ उठला असून विकासकामे आणी सर्वसामान्य जनतेची काळजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील घेतात म्हणून त्यांचा पोटसूळ उठला असून याचे उत्तर जनता आगामी लोकसभा निवडणुकीत देईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे. संग्राम पावडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी माजी सरपंच अशोक मावळे यांनी आभार मानले.