अहमदनगर। नगर सहयाद्री-
साध्या माणसाचा खरा चेहरा आता लोकांसमोर येऊ लागला असून दहशत, गुंडगिरी अशी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीकडून जनता दुसरी कोणती अपेक्षा करणार अशा शब्दात महसूल मंत्री विखे पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला.
अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात कांटे की टक्कर पहायाला मिळत आहे. शरद पवार पक्षाच्या उमेदवारासाठी रींगणात उतरले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही विखे पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहे.
त्यातच, लंके यांनी पोलिसांना उद्देशून केलेल्या विधानामुळे ते पुन्हा चर्चत आले आहे. त्याच्या वक्तव्यावरून मंत्री विखे पाटील यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी अहमदनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातून पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी 8 वेळा संसदेत प्रतिनिधित्व केले. जनतेने मला 7 वेळा आमदार केलं आहे. हे पद्मश्रींनी दिलेल्या विचारांचे यश आहे. त्यांच्या संस्कारातच विखे परिवाराची अविरत वाटचाल सुरू आहे.
ज्यांनी जिल्ह्याच्या विकास कामात नेहमी अडसर निर्माण केली. जिल्ह्यातील विकासाची प्रक्रिया ज्यांना देखवत नाही, त्यांच्याशी जिल्ह्याच्या विकासाबाबत आपली खुली चर्चा करण्याची केव्हाही तयारी आहे. अशा शब्दात शरद पवार यांच्या प्रश्नांवर सडेतोड उत्तर त्यांनी दिले.
साध्या माणसाचा खरा चेहरा आता लोकांसमोर येऊ लागला असून दहशत, गुंडगिरी अशी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार? असा सवा उपस्थित करत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यावर निशाणा साधला.