spot_img
ब्रेकिंगब्रेकिंग: अखेर 'तो' गुन्हा रद्द! राज ठाकरे यांना दिलासा, काय आहे प्रकरण?

ब्रेकिंग: अखेर ‘तो’ गुन्हा रद्द! राज ठाकरे यांना दिलासा, काय आहे प्रकरण?

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरें विरोधात दाखल प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना हायकोर्टाने दिलासा दिल्याची बातमी समोर आली आहे. हायकोर्टाने कल्याण पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द केला आहे.

२०१० मध्ये तडीपारीची नोटीस न स्वीकारल्याबद्दल कल्याण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी साल २०११ मध्ये राज ठाकरेंनी कल्याण कोर्टात हजेरी लावत जामीन मिळवला होता.

नोटीसच्या प्रकरणात राज ठाकरे यांनी आपल्यावरील गुन्हे आणि त्या अनुषंगाने न्यायालयाने सुरू केलेली कारवाई रद्द करण्यासाठी याचिका केली होती.

त्या याचिकेवर अंतीम सुनावणी होत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलासा मिळाला असून न्यायालयाने दाखल केलेला गुन्हा रद्द केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता प्रत्येक तालुक्याला भाजपचे तीन अध्यक्ष; निवडीकडे लागले सर्वांचे लक्ष

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी आता प्रत्येक...

‘कर्जुले हर्या येथे हरेश्वर महाराजांच्या उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता’

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथे स्वयंभू भगवान श्री हरेश्वर महाराज यांचा...

‘भिक्षेकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणाची मंत्री विखे पाटलांनी घेतली गंभीर दखल’; दिले मोठे आदेश

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्हा रुग्णालयात चार भिक्षेकरूंचा मृत्यूनंतर प्रशासनावर गंभीर आरोप झाले आहेत. पालकमंत्री...

‘नगरमध्ये भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिंसा परमो धर्म: अशा महान उपदेश देत संपूर्ण जगाला दिशा देणाऱ्या...