spot_img
ब्रेकिंगब्रेकिंग ! दरोडेखोरांचा धुमाकूळ, दरोडा टाकत बेदम मारहाण करत लुटले, पोलिसांवरही दगडफेक......

ब्रेकिंग ! दरोडेखोरांचा धुमाकूळ, दरोडा टाकत बेदम मारहाण करत लुटले, पोलिसांवरही दगडफेक… फायरिंग..

spot_img

वैजापूर / नगर सह्याद्री : अनेक ठिकाणी चोरट्यांचा धुडगूस सुरु असल्याच्या बातम्या येत असतात. आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

कुटुंबास मारहाण करत हजारो रुपये लांबवले असल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे दरोडेखोरांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीस ठाणे हद्दीत व मनेगाव शिवारात ही खळबळजनक घटना घडली आहे.

अधिक माहिती अशी : विष्णू पंढरीनाथ सुराशे (वय 50 वर्षे) हे त्यांच्या पत्नी हिराबाई व मुलगा रुपेश यांच्यासह मनेगाव शिवारातील शेतवस्तीवर राहतात. रात्री 11 वाजता त्यांचा मुलगा रुपेश याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने ते उठले. त्यांनी समोरील घटना पाहिली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिने चाकूचा धाक दाखवून चोरून नेले. त्यानंतर त्यांनी शिऊर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.

दरम्यान या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुन्ह्यातील आरोपी जानेफळ शिवारात एका शेतात लपून असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जानेफळ शिवारातील बिबटे वस्ती येथे पोहचले. त्यांना बघताच चोरटयांनी त्यांच्यावर दगडफेक केली.

पोलिसांनी शिताफीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात उपनिरीक्षक दुल्लत, पोलिस हेड कॉन्स्टेबल वाल्मीक निकम, व संजय घुगे हे जखमी झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप सहाजणांना ताब्यात घेतले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात मातब्बर पुढाऱ्यांना धक्का; सरपंच पद झाले आरक्षित, या गावांत ‘महिलाराज’

सुनील चोभे / नगर सह्याद्री - थेट जनतेतून सरपंच निवडण्यासाठी नगर तालुक्यातील 105 गावांची आरक्षण...

अकोळनेर नगरीत भक्तीचा महापूर; दिड लाख भाविकांना पाच लाख पुरणपोळ्याचा महाप्रसाद

जगद्गुरु तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैह वैकुंठगमन सोहळ्याची काल्याच्या किर्तनाने सांगता सुनील चोभे / नगर...

अहिल्यानगरमध्ये ऑनलाईन वेश्याव्यवसाय; पोलिसांची मोठी कारवाई..

Ahilyanagar Crime: शिर्डीपासून जवळच असलेल्या एका हॉटेलवर गैरकृत्याचा प्रकार सुरु होता. ओंलीने पद्धतीने बुकिंग...

जामखेडमध्ये रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; अधिकाऱ्यांकडून केले असे, पहा नेमकं काय घडलं

जामखेड / नगर सह्याद्री : शहरातील आरोळे वस्ती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी वसतीगृहात...