spot_img
ब्रेकिंगअखेर शोधलं! सलमान खानच्या घरावर का केला गोळीबार? 'ते' दोघे गजाआड

अखेर शोधलं! सलमान खानच्या घरावर का केला गोळीबार? ‘ते’ दोघे गजाआड

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर रविवारी (१४ एप्रिल रोजी) गोळीबार झाला. त्यामुळे सिनेसृष्टीतही मोठी खळबळ उडाली होती. आत गोळीबार प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसाच्या गुन्हे शाखेने मध्यरात्री दोन आरोपींना गजाआड केले आहे. विक्की साहब गुप्ता (वय २४) आणि सागर श्रीजोगेंद्र पाल (वय २१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर रविवारी (१४ एप्रिल रोजी) गोळीबार झाला. ही घटना घडली तेव्हा सलमानसह इतर सर्वजण घरातच होते, पण कोणीही जखमी झालेलं नाही. सलमानच्या घराबाहेरील मोठी सुरक्षा वाढविण्यात आली होती. सलमान खानवर एवढा गोळीबार करण्याची हिंमत कोणी केली. याचा तपासकामी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांची तपास यंत्रणा सज्ज झाली होती.

पनवेलमधून दोन संशयितांना ताब्यात देखील घेतलं होतं. त्यांची कसून चौकशी केली आसता सोमवार दि १५ एप्रिलच्या मध्यरात्री पोलिसांनी गुजरातमधील भूज येथून दोन आरोपींना शोधलं आहे. याच आरोपींनी सलमान खानच्या घरावर गोळीबार केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘त्यांच्या’ हिंदुत्वामध्ये खोटारडेपणा!; किरण काळेंनी विचारांची ‘मशाल’ पेटवली..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- २३ फेब्रुवारीला मी शिवबंधन बांधत शिवसेनेत शरीराने प्रवेश केला. मात्र मी...

काँग्रेसला धक्के पे धक्का! बडा नेता धनुष्यबाण हाती घेणार?

Maharashtra Politics : पुण्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी...

गावगुंडांची विवाहितेकडे विकृत मागणी? घटनेने शहरात खळबळ!

Crime News : एक संतापजनक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील गावगुंडांनी एका...

सावधान! राज्यात उष्णतेचा कहर; ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेची लाट येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाल्याच चित्र बघायला मिळत आहे. परिणामी...