spot_img
ब्रेकिंगअखेर शोधलं! सलमान खानच्या घरावर का केला गोळीबार? 'ते' दोघे गजाआड

अखेर शोधलं! सलमान खानच्या घरावर का केला गोळीबार? ‘ते’ दोघे गजाआड

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर रविवारी (१४ एप्रिल रोजी) गोळीबार झाला. त्यामुळे सिनेसृष्टीतही मोठी खळबळ उडाली होती. आत गोळीबार प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसाच्या गुन्हे शाखेने मध्यरात्री दोन आरोपींना गजाआड केले आहे. विक्की साहब गुप्ता (वय २४) आणि सागर श्रीजोगेंद्र पाल (वय २१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर रविवारी (१४ एप्रिल रोजी) गोळीबार झाला. ही घटना घडली तेव्हा सलमानसह इतर सर्वजण घरातच होते, पण कोणीही जखमी झालेलं नाही. सलमानच्या घराबाहेरील मोठी सुरक्षा वाढविण्यात आली होती. सलमान खानवर एवढा गोळीबार करण्याची हिंमत कोणी केली. याचा तपासकामी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांची तपास यंत्रणा सज्ज झाली होती.

पनवेलमधून दोन संशयितांना ताब्यात देखील घेतलं होतं. त्यांची कसून चौकशी केली आसता सोमवार दि १५ एप्रिलच्या मध्यरात्री पोलिसांनी गुजरातमधील भूज येथून दोन आरोपींना शोधलं आहे. याच आरोपींनी सलमान खानच्या घरावर गोळीबार केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) शपथविधीनंतर...

शनिवारी शटडाऊन, नगर शहरात पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात...

कोणी लाईट देता का लाईट?; महावितरणचे रोहित्र असून अडचण नसून खोळंबा

पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍यांना शेतीपंप व घरगुती वीज...

राणी लंकेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला; कोण काय म्हणाले पहा…

लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल पारनेर...